जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

By Admin | Updated: February 12, 2017 00:30 IST2017-02-12T00:30:41+5:302017-02-12T00:30:41+5:30

बुलडाणा येथे अमरावती विभागीय जिल्हा परिषद कर्मचारी स्पर्धांना सुरवात झाली.

The launch of Zilla Parishad regional sports competitions | जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

जिल्हा परिषद विभागीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

बुलडाणा, दि. ११- जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा परिषद अधिकारी- कर्मचारी यांच्या अमरावती विभागीय क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन ऐतिहासिक ठरणार आहे. या महोत्सवात सहभागी स्पर्धकांमध्ये शिक्षकांची संख्या लक्षणीय असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविणारे द्रोणाचार्य निर्माण होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी व्यक्त केला.
जिल्हा क्रीडा संकुल येथे आयोजित जिल्हा परिषद अधिकारी -कर्मचारी यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन शनिवारी संपन्न झाले. यावेळी अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू अभिलाषा म्हात्रे, छत्रपती पुरस्कार विजेते हॉकीपटू अजित लाकरा, वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्‍वेता खेडेकर, बुलडाणा अर्बन परिवाराचे संस्थापक राधेश्याम चांडक, अमरावती जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखेडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, अमरावतीचे जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बुलडाण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

Web Title: The launch of Zilla Parishad regional sports competitions