कारागृहात एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

By Admin | Updated: October 5, 2016 00:26 IST2016-10-05T00:26:13+5:302016-10-05T00:26:13+5:30

येथील मध्यवर्ती कारागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एलईडी दिवे निर्मितीच्या...

Launch of Prison Jail LED Lights Project | कारागृहात एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

कारागृहात एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ

उपक्रम : बंद्यांच्या हाताला रोजगार 
अमरावती : येथील मध्यवर्ती कारागृहात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून एलईडी दिवे निर्मितीच्या नव्या प्रकल्पास शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता यांच्या हस्ते प्रकल्प सुरु करण्यात आला, हे विशेष.
सुधारणा व पुनर्वसन अंतर्गत बंदीजनांच्या हाताला काम मिळावे, रोजगाराचे साधने उपलब्ध व्हावे, यासाठी कारागृह अधीक्षक भाईदास ढोले यांनी सातत्याने धावपळ चालविली आहे. हातून कळत नकळत झालेल्या चुकांचे न्यायालयाच्या आदेशानुसार कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या बंदीजनांना मानवाधिकार नुसार अधिकार देताना त्यांच्यात मानवता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्न सुरुच आहे.
रोजगार निर्मितीला सवाधिक प्राधान्य देण्याचे नियोजन कारागृह प्रशासनाने आखले आहे. याअनुषंगाने महात्मा गांधी यांची जयंती ‘बंदी कल्याण दिन’ म्हणून साजरा करताना बंदीजनांना रोजगार देण्याचा मानस आहे. यापूर्वी कारागृह एलईडी दिवे निर्मिती प्रकल्प सुरु करण्यात आला आहे.
मात्र या प्रकल्पाची व्याप्ती अधिक वाढविण्यासाठी नव्याने एलईडी दिवे निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. बंदीजनांनी गायीलेल्या देशभक्ती गीतांनी कारागृह परिसर देशभक्तीमय झाला होता. समता मेमोरियल फाऊंडेशनचे विनोद सदावर्ते यांच्याद्वारे मोफत डोळे तपासणी व चष्मेवाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of Prison Jail LED Lights Project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.