महापालिका खरकाडीपुरा शाळेत ई-लर्निंग प्रकल्पाचा शुभारंभ

By Admin | Updated: September 1, 2014 23:15 IST2014-09-01T23:15:11+5:302014-09-01T23:15:11+5:30

गरीब परिस्थितीतील मुला-मुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनपाच्या शाळासुद्धा खासगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने नवनवीन शिक्षण पद्धतीद्वारा अध्यापन करता यावे,

Launch of e-Learning project in municipal Kharkadipura school | महापालिका खरकाडीपुरा शाळेत ई-लर्निंग प्रकल्पाचा शुभारंभ

महापालिका खरकाडीपुरा शाळेत ई-लर्निंग प्रकल्पाचा शुभारंभ

अमरावती : गरीब परिस्थितीतील मुला-मुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मनपाच्या शाळासुद्धा खासगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी, या उद्देशाने नवनवीन शिक्षण पद्धतीद्वारा अध्यापन करता यावे, याकरिता महापालिका शाळा क्र. ६ खरकाडीपुरा येथे आ. रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते ई-लर्निंग या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आयुक्त अरूण डोंगरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर रोटरी क्लब आॅफ अमरावतीच्या मदतीने सुरू करण्यात येत आहे.
खरकाडीपुरा हा गरीब वस्तीचा परिसर असून येथील मुलांमध्ये गुणवत्ता वाढावी व त्यांना संगणकीय ज्ञान अवगत व्हावे व आनंददायी शिक्षण मिळावे, या हेतूने या शाळेत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आयुक्त अरूण डोंगरे, माजी महापौर विलास इंगोले, शिक्षण समिती सभापती हमीदाबी अफजल चौधरी, शिक्षण समिती उपसभापती अर्चना राजगुरे, नगरसेवक वसंतराव साऊरकर, नगरसेविका सुनीता भेले, उपायुक्त रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, शाळा निरीक्षक प्रवीण पाटील, चित्रा खोब्रागडे, मनोज भेले, अफजल चौधरी, गजानन राजगुरे उपस्थित होते.
शिक्षण समिती सभापती यांनी सदर प्रकल्प सुरू केल्याबद्दल आयुक्तांचे अभिनंदन केले. अजूनही नवीन प्रकल्पाची सुरूवात करावी, अशी आशा व्यक्त केली. विलास इंगोले यांनी हे प्रकल्प विकास कामापेक्षाही मोठे आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांची प्रगती ही नक्कीच होणार आहे. ही शाळा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे.
मनपा आयुक्तांनी सदर प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर असून यशस्वी झाल्यास मनपाच्या प्रत्येक शाळेत राबविले जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त निर्माण करावी, पुढील वर्षी या शाळेला १०० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे मनपा प्रशासनाकडून संगणक कक्ष निर्माण केले जाईल.
आ. रावसाहेब शेखावत यांनी हे प्रकल्प सुरू केल्याबद्दल मनपा प्रशासनाचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत चर्चा केली व प्रकल्प कसा फायदेशीर आहे याचे महत्त्व पटवून दिले.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापिका अरूणा डांगे यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रकल्पाद्वारे अध्यापन कसे केले जाईल यांचे प्रात्यक्षिक पाहुण्यांना करण्यात आले. प्रकल्पामध्ये विद्यार्थ्याच्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आकाश गंगा, शरीराचे अवयव व कार्य, विज्ञानातील प्रयोग, दिवस रात्र अशा कठीण संकल्पना लवकरच स्पष्ट होण्यास निश्चितच मदत होणार आहे. संचालन कोपुल तर विजया खुळे यांनी केले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व पालकवर्ग उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Launch of e-Learning project in municipal Kharkadipura school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.