महापालिका शाळेत ‘ई-लर्निंग’चा शुभारंभ
By Admin | Updated: August 16, 2014 23:14 IST2014-08-16T23:14:06+5:302014-08-16T23:14:06+5:30
गरीब परिस्थितीतील मुलामुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मनपाच्या शाळा सुध्दा खाजगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने नवनवीन शिक्षण पध्दतीव्दारा

महापालिका शाळेत ‘ई-लर्निंग’चा शुभारंभ
अमरावती : गरीब परिस्थितीतील मुलामुलींना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन मनपाच्या शाळा सुध्दा खाजगीच्या तुलनेत याव्यात व शाळांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने नवनवीन शिक्षण पध्दतीव्दारा अध्यापन करता यावे या उद्देशाने नुकतेच मनपा शाळा नं. १४ वडाळी येथे महापौर वंदनाताई कंगाले यांच्या हस्ते ई-लर्निंग या प्रकल्पाचे मोठ्या उत्साहात शेकडो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.
मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर रोटरी क्लब आॅफ अमरावतीच्या मदतीने सुरु करण्यात येत आहे. वडाळी हा गरीब परिसर असून येथील मुलांमध्य गुणवत्ता वाढली असून त्यांना कम्प्युटरचे ज्ञान व्हावे व आनंददायी शिक्षण मिळावे या हेतुने या शाळेत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मनपा आयुक्त अरुण डोंगरे, स्थायी समिती सभापती मिलींद बांबल, शिक्षण सभापती हमीदाबी, वार्डाचे नगरसेवक विजय बांभुळकर, सपनाताई ठाकूर, सुजाता झाडे, नुतन भुजाडे, उपायुक्त रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान इयत्ता २ रीची रसिका लोखंडे या चिमुकलीने मराठीमध्ये तर साक्षी गरुड हिने इंग्रजीमध्ये अस्थिलपतपणे भाषण देवून सर्वांना चक्क केले. तर ७ वी च्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत झळकलेली या शाळेतील पूर्वा गायकवाड हिचा महापौर, आयुक्त, सभापती यांनी सत्कार केला. उद्घाटनानंतर या प्रकल्पाव्दारे अध्यापन कसे केले जाईल याचे प्रात्यक्षिक पाहुण्यांना सादर करण्यात आले. या प्रकल्पामध्ये विद्यार्थ्यांच्या सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, आकशगंगा, शरीराचे अवयव व कार्य, विज्ञानातील प्रयोग, दिव-रात्र अशा कठीण संकल्पना लवकरच स्पष्ट होण्यास निश्चितच मदत होणार असून संगणकीय ज्ञानाची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल. उपस्थित पाहुण्यांनी भाषणादरम्यान शाळेचे मुख्याध्यापक योगेश पखाले व शिक्षकांचे अभिनंदन केले तर हा प्रकल्प यशस्वी व्हावा याकरिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन गोपाल अभ्यंकर तर आभार प्रदर्शन योगेश राणे यांनी केले. (प्रतिनिधी)