शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

तीन वर्षांत ग्रामीण पोलीस विभागात आरटीआयचे २४७५ अर्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 19:53 IST

सरकारी व पोलीस विभागाशी सबधीत माहिती मागवण्यासाठी मागील तीन वर्षात २४७५ माहितीच्या अधिकाराचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत.

 - चेतन घोगरे  अमरावती -  सरकारी व पोलीस विभागाशी सबधीत माहिती मागवण्यासाठी मागील तीन वर्षात २४७५ माहितीच्या अधिकाराचे अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत. त्यांची माहिती पुरवण्यास पोलिसांना यशही आले आहे. दरम्यान, माहिती अधिकारात सर्वाधिक माहिती ही वैयक्तिक प्रकारची मागविल्याचे सूत्रांकडून समजते.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार सर्वसामान्य नागरिक कोणतीही माहिती माहितीच्या अधिकारात मागू शकतो. त्यानुसार जिल्हा ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे आतापर्यंत तीन वर्षात २४७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये २०१५ वर्षात ९२६ पैकी ८९२, २०१६ ला ७११ पैकी ८५२, २०१७ मध्ये ८३८ पैकी ६९७ माहिती अधिकार अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. एकूण १३२ माहिती अधिकार अर्ज नाकारण्यात आले आहेत. माहिती अधिकार अर्जाच्या अहवालाच्या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहितीपोटी २०१५ मध्ये ४१३३ रुपये, २०१६ मध्ये ४६६६ व २०१७ मध्ये ४०१७ असे एकूण १२,८५६ रुपये पोलीस विभागाकडे जमा झालेले आहेत. अर्ज प्राप्त होताच पोलीस गृहविभागाकडून संबंधित पोलीस ठाण्याकडे माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ६ (३) (२) नुसार तो वर्ग केला जातो. त्याचप्रमाणे ठाणे प्रमुख किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी त्यावर पुढील कारवाई करतात. यातही अर्जदाराचे समाधान न झाल्यास अपीलीय अधिकारी असलेले पोलीस उपअधीक्षक यांच्याकडे अर्जदार त्याबाबत दाद मागू शकतो.  याचबरोबर अर्जाची पूर्तता करावी व संबंधिताला कळवावे, असे पत्रात नमूद असते. एक प्रत पाठवून संबंधित अर्जदाराशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जाते.

असे चालते कामपोलीस गृहविभागाचे उपअधीक्षक शिरीष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ लिपिक एस.आर. शिंदे हे कर्मचारी आलेल्या माहितीचा अधिकार अर्जाचा निपटारा करतात व माहिती अधिकार अर्जदाराचे समाधान करतात.

माहिती अधिकारात अर्ज प्राप्त होताच तात्काळ तो संबंधितांकडे वर्ग केला जातो. वेळेत व परिपूर्ण माहिती देण्यासंदर्भात आदेश दिले जातात.- दिलीप झळके, पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण

टॅग्स :PoliceपोलिसAmravatiअमरावती