शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चानक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
5
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
6
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
7
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
10
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
11
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
12
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
13
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
14
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
15
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
17
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
18
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
19
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
20
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजार किलोमीटरने सरकला भारताचा भूभाग

By admin | Updated: February 28, 2015 00:35 IST

आशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील

वैभव बाबरेकर अमरावतीआशिया खंडातील भारत देशाचा भूभाग मूळ जागेवरून तब्बल पाच हजार किलोमीटर अंतरापर्यंत सरकला असल्याचा महत्त्वपूर्ण निष्कर्ष संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील भूगर्भशास्त्र विभागप्रमुख सय्यद फजल रहेमान खादरी यांनी संशोधनांतून मांडला. खादरी हे भूगर्भशास्त्राचे विभागप्रमुख व भूगर्भ संशोधक आहेत. खादरी यांनी या संशोधनासाठी खंड वाहकाच्या सिध्दांताचा आधार घेतला. ६०० लाख वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखीत भारताचा भूगाग १८० डिग्रीने फिरला व भूभागाचे उत्तर-पूर्व दिशेने वहन सुरु झाले. त्यावेळच्या भूभागाची दिशा व आताच्या दिशेशी जुळत नसल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले आहे. हिमालयावर आजही आढळतात समुद्रातील अवशेष भारतात विविध ठिकाणी पसरलेला ज्वालामुखी थंड होऊन दगड मातीमध्ये रुपांतरित झाला होता. तेव्हापासून काळे दगड अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर ५० मिलिनियम वर्षांनंतर उलथापालथ झाली व समुद्रालगतची जागा उंचावली. त्यामुळे हिमालयाच्या पर्वतरांगा तयार झाल्या. आजही या पर्वतरांगांच्या टोकावर समुद्रातील अवशेष आढळतात. हिमालय पर्वत श्रुंखलेत सर्वात उंच एव्हरेस्ट पर्वत असून त्याची उंची ८,८४८ मीटर म्हणजे ९ किलोमीटर उंच आहे. तसेच उंचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर काश्मीर येथील के-२ पर्वत आहे. तापमानावर चुंबकत्वाचे प्रमाण बेसाल्ट या खडकामध्ये ०.५ ते १ टक्के चुंबकीय खनीज आहे. ज्वालामुखीचे तापमान १२०० डिग्री सेंटीग्रेट असल्याने हे खडक वितळतात. तापमान अधिक असतानाच या काळ्या दगडाचे चुंबकत्व बदलू शकते. तापमान वाढले की चुंबकत्व कमी होते व थंड झाले की वाढते. सद्यस्थितीत काळ्या दगडावरील अवशेष आढळले आहे.'अ‍ॅथिनोस्पीअर' पदार्थावर तरंगतोय भूखंड भारताचा भूभाग हा उत्तर-पूर्व दिशेने वढत आहे. तेव्हापासून पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश हे भारताशी जोडलेले आहेत. त्यावेळी ज्वालामुखीतून (हॉटस्पॉट) निघालेला लाव्हा भारतातील १० लाख स्केअर किलोमीटर भूभागात पसरला आहे. जमिनीच्या आत १०० किलोमीटरवर 'अ‍ॅथिनोस्पीअर' हा पदार्थ आहे. त्यावर असणारा हा भूखंड नॉर्थ-ईस्ट दिशेने सरकत गेल्याने भारताचा भूखंड वेगळा झाला. अवघ्या काही वर्षांपूर्वी अंदमान-निकोबार या बेटांवर ज्वालामुखीचा उद्रेक झाला. खडकांच्या नमुन्यावरून त्या ठिकाणी आढळलेल्या खडकाची दिशा व तयार झाल्याचे वर्ष तंतोतंत जुळविता येते, असे सै. फजल रहेमान खादरी यांनी सांगितले.