पोलीस उपायुक्तांनी मागितली एक लाखाची लाच
By Admin | Updated: July 7, 2014 23:19 IST2014-07-07T23:19:24+5:302014-07-07T23:19:24+5:30
येथील अन्न धान्य पुरवठा विभागातील अनियमीततेविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना वेळेत अटक करून न्यायालयात सादर करण्यासाठी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी एक

पोलीस उपायुक्तांनी मागितली एक लाखाची लाच
पत्रपरिषद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आरोप
अमरावती : येथील अन्न धान्य पुरवठा विभागातील अनियमीततेविरोधात आंदोलन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांना वेळेत अटक करून न्यायालयात सादर करण्यासाठी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांनी एक लाख रूपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक आरोप मनसेचे नेते पप्पू पाटील यांनी सोमवारी पत्रपरिषदेतून केला.
पप्पू पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी पुरवठा विभागातील गलथान कारभाराविरोधात मनसेचे जिल्हा प्रमुख प्रवीण तायडे व शहराध्यक्ष संतोष बद्रे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. याच दिवशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सिंचन विभागात तोडफोड करून निषेध व्यक्त केला. मात्र, ४ जुलै रोजी गाडगेनगर पोलीस ठाण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आधी मनसेचे कार्यकर्ते गोळा झाले असता त्यांना अटक करण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला. उलटपक्षी गाडगेनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रदीप राजूरकर, रवींद्र नायकवाड हे दोघे माझ्या घरी पोहोचले व अटक केली, असा आरोेपही पाटील यांनी केला आहे.