शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
5
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
6
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
7
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
8
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
9
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
10
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
11
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
12
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
13
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
14
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
15
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
16
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
17
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

जिल्ह्यात रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती घटली

By जितेंद्र दखने | Updated: April 2, 2024 22:17 IST

१,१३० कामावर केवळ ९ हजार ८२६ मजूर

अमरावती: जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ३४४ ग्रामपंचायत व यंत्रणा मिळून १ हजार १३० कामे सुरू आहेत. या कामावर २ एप्रिल रोजी ९ हजार ८२६ मजुरांची उपस्थिती आहे. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे शेतीची कामे आटोपली आहे. मात्र, अशातच दुसरीकडे रोहयोवरील मजुरांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात घटली आहे.

शासनाकडून स्थानिक पातळीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. दरवर्षी या कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतो. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात रस्ते, जलसंवर्धन, सिंचन विहिरी, वृक्षारोपण, रोपवाटिका यासह विविध कामे केली जात आहेत. जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभाग, रेशीम उद्योग, ग्रामपंचायत, कृषिविभाग, सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या वतीने मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. जिल्ह्यात सध्या वृक्षलागवड, बांबू लागवड, सिंचन विहीर, वैयक्तिक वृक्षलागवड, जनावरांचा गोठा, कुक्कुटपालन शेड, रस्ते, शेततळे, फळबाग लागवड, शोषखड्डे, गांडूळ खत निर्माती, घरकूल, पेव्हर ब्लॉक, शाळा इमारतीसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग संरचना, शाळा शौचालय, शाळा संरक्षक भिंत, शाळा परिसरात काँक्रीट नाला बांधकाम, शेततळी, रस्ते, रोपवाटिका, रेशीम उद्योग अशी कामे करण्यात येत आहेत. मात्र, रोहयोच्या कामावरील हजारो मजुरांच्या मजुरीचा मोबदला गत तीन महिन्यांपासून मिळाला नसल्याने मजुरांनीही रोहयोच्या कामावर पाठ फिरविली आहे.रोजगाराची हमी देणारी रोजगार हमी योजनासन १९७२ मध्ये पडलेल्या दुष्काळाच्या संकटावर मात करून लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांनी ही योजना आकारास आणली. रोजगार हमी योजनेची पायाभरणी वसंतराव नाईक यांनी केली. त्यामुळे त्यांना रोजगार हमी योजनेचे जनक मानले जाते. रोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते.तालुका - कामे - मजूर उपस्थितीअचलपूर - ९३ - ८३९अमरावती - ८२ - ५०७अंजनगाव सुजी - २३ - १२६भातकुली - १४ - ९६चांदूर रेल्वे - ३२ - १४१चांदूर बाजार - ८२ - ४९३चिखलदरा - १८४ - २,६०५दर्यापूर - ६७ - ३१७धामनगांव रेल्वे - ३७ - २२५धारणी - १२६ - १,३३६मोर्शी - ६९ - १,१११नांदगाव खंडेश्वर - ९२ - ४६९तिवसा - ४७ - ३४७वरुड - १८२ - १,२१४मार्च महिन्यात होती १ लाखावर मजूर उपस्थितीमहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर गत ६ मार्चपर्यंत जिल्हाभरात ५ हजार ५६९ कामावर सुमारे १ लाख ४६९ एवढे मजूर उपस्थित होते. होळीपासून मात्र रोहयोवरील मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात घटली आहे. आजघडीला ही मजूर उपस्थित १० हजारांच्या आत असून कामांची संख्या १,१३० एवढीच आहे. येत्या १० एप्रिलनंतर रोहयोच्या कामावर मजूर उपस्थिती व कामांची संख्याही वाढण्याची शक्यता रोहयो विभागाकडून वर्तविली आहे.रोजगार हमी योजनेंतर्गत मागेल त्याला काम उपलब्ध आहे. होळी सणामुळे कामावरील मजुरांची संख्या कमी झाली आहे. येत्या १० एप्रिलनंतर राेजगार हमी योजनेच्या कामे व मजूर उपस्थिती वाढेल.- श्रीराम कुलकर्णी, डेप्युटी सीईओ (रोहयो)

टॅग्स :Amravatiअमरावती