शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केवायसी चुकीची दुरुस्ती; लाडक्या बहिणींना ३१ ची मुदत; या चुकांमुळे बंद झाला होता लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 17:42 IST

Amravati : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे. अशा महिलांना आता दुरुस्ती करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत अंतिम संधी देण्यात आली आहे. संबंधित लाभ पुन्हा सुरू करण्यासाठी ही दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणावर अर्जदारांनी ई-केवायसी पूर्ण केली असली, तरी काही महिलांनी माहिती चुकीची भरल्याने किंवा निकषांबाबत गोंधळ झाल्याने त्यांचे अर्ज अडचणीत आले आहेत. त्यामुळे शासनाच्या महिला व बालविकास विभागाने आता या चुका दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एक संधी दिली आहे. यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. यासाठी ३१ मार्च २०२६ पर्यंत ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करताना चुकीचे पर्याय निवडल्यामुळे लाभ बंद झालेल्या किंवा अर्ज प्रलंबित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यातील अनेक बहिणींना दिलासा

जिल्ह्यातील हजारो महिलांचे हप्ते तांत्रिक कारणांमुळे लाडक्या बहिणीचा लाभ रखडा होता. परिणामी शासनाने नव्या मुदतवाढीमुळे या महिलांना आता थकीत हप्त्यांसह पुढील लाभमिळण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून पात्र महिलांना या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

या चुकांमुळे बंद झाला होता लाभ

अनेकांनी ई-केवायसी करताना 'नाही' ऐवजी 'हो' असा चुकीचा पर्याय निवडला होता. तसेच आधारकार्ड आणि बैंक खात्यावरील नावातील तफावत, बँक खाते डीबीटीसाठी सक्रिय नसणे यासारख्या तांत्रिक त्रुटींमुळे लाभ मिळणे बंद झाले होते.

ई-केवायसी करताना ही काळजी घ्यावी

महिलांनी ई-केवायसी करताना स्वतःचा अचूक आधार क्रमांक द्यावा आणि मोबाईलवर आलेला ओटीपी कोणालाही शेअर करू नये. तसेच बँक खाते आधारशी लिंक असल्याची खात्री बँकेत जाऊन करणे आवश्यक आहे.

तांत्रिक चुकांचा फटका

योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यात घाईगडबडीत अर्ज भरताना किंवा ई-केवायसी करताना अनेक महिलांनी चुकीचे पर्याय निवडले होते. विशेषतः बँक खाते आधारशी लिंक नसणे किंवा माहिती चुकीची भरली जाणे, यामुळे लाखो महिलांचे हप्ते थांबले होते. आता या महिलांना माहिती अद्ययावत करण्याची शेवटची मुभा दिली आहे.

ई-केवायसीसाठी संधी

ज्या लाभार्थ्यांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव प्रलंबित आहेत किंवा ज्यांचा लाभ बंद झाला आहे, त्यांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही शेवटची तारीख आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याने महिलांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय लाभ मिळणार नाही.

कोणत्या लाभार्थ्यांना ई-केवायसीची मुभा ?

महिलांचे अर्ज मंजूर असूनही खात्यात पैसे जमा झाले नाहीत, ज्यांच्या अर्जात बँक माहितीची त्रुटी आहे किंवा ज्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केलेले नाही, अशा महिलांना ही दुरुस्ती करता येईल.

कशामुळे हप्ता बंद, कुठे कळणार?

लाभार्थी महिलांना त्यांच्या अर्जाची स्थिती प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयात जाऊन तपासता येईल. तसेच अंगणवाडी सेविका यांच्याकडे जाऊन आपला हप्ता का थांबला आहे, याची खात्री करता येईल.

अशी घटत गेली लाभार्थीची संख्या

दुसरीकडे, निकषात बाद ठरल्याने अपात्र महिलांची संख्याही वाढली आहे. सुरुवातीला नोंदणीकृत महिलांची संख्या मोठी होती, मात्र कडक पडताळणी, प्राप्तिकर भरणारे कुटुंब आणि ई-केवायसीमधील त्रुटींमुळे लाभार्थ्यांचा आकडा मोठ्या प्रमाणात घटला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ladki Bahina Yojana: Deadline for KYC Correction, Benefits Restored

Web Summary : Women facing Ladki Bahina Yojana benefit disruptions due to KYC errors now have until March 31st to correct them. This final opportunity aims to reinstate benefits lost due to incorrect information or technical issues, offering relief to thousands of women.
टॅग्स :ladki bahin yojanaलाडकी बहीण योजनाAmravatiअमरावतीgovernment schemeसरकारी योजना