आमवृक्षावर संगोपनीऐवजी कु-हाडीचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:14 IST2021-02-13T04:14:39+5:302021-02-13T04:14:39+5:30
पान ३ चांदूर बाजार : गावखेड्यात पूर्वी हिरवीगार डहाळीने आकर्षित करणारी गावरान आमराया आता दुर्मिळ झाल्या आहेत. संगोपनाऐवजी जुन्या ...

आमवृक्षावर संगोपनीऐवजी कु-हाडीचे घाव
पान ३
चांदूर बाजार : गावखेड्यात पूर्वी हिरवीगार डहाळीने आकर्षित करणारी गावरान आमराया आता दुर्मिळ झाल्या आहेत. संगोपनाऐवजी जुन्या हिरवेगार आम्रवृक्षांवर कु-हाडीचे घाव बसत असल्याने गावरान आंबा आता हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे.
पूर्वीच्या काळात आंब्याचे झाड लावणे म्हणजे एक पुण्यकर्म समजले जायचे. आजोबांनी लावलेल्या झाडाचे आंबे नातवाला खायला मिळत होते. तसेच गावरान वृक्षाचे आयुष्य अडीचशे तीनशे वर्षांपर्यंत आहे. परंतु काळानुरूप व वातावरणाचा परिणाम वृक्षावर होत आहे. आताही काही भागात आम्रवृक्षाचे झाड डोळ्याचे पारणे फेडते. मात्र यावर्षी वातावरणाचा परिणाम आम्रवृक्षवर झालेला दिसत आहे. यंदा आमराईतील आम्रवृक्षाला आलेला कमी बहार त्याची साक्ष देत आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याच्या रसाला मुकावे लागणार की काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
आयुर्वेदिक शास्त्रात आम्रवृक्षाचे विविध गुण सांगितले आहे. भारतीय संस्कृतीत लग्नकार्य उरकल्यावर नव्या वर - वधूला शेवया व आंब्याचा रस खाण्यास देण्याची परंपरा रूढ आहे. मात्र, आता गावरानी आंबा मिळत नसल्याने तोतापुरी, निलाम अशा आंब्यांची चलती आहे.