दडपशाहीचा किसान सभेतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:18 IST2020-12-05T04:18:14+5:302020-12-05T04:18:14+5:30
नेरपिंगळाई : शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात व स्वामिनाथन आयोग लागू करण्याकरिता देशभरातील शेतकरी अखिल भारतीय किसान समन्वय ...

दडपशाहीचा किसान सभेतर्फे निषेध
नेरपिंगळाई : शेतकरीविरोधी कायद्यांच्या विरोधात व स्वामिनाथन आयोग लागू करण्याकरिता देशभरातील शेतकरी अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या नेतृत्वात दिल्लीत लढा देत आहेत. मात्र, ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहे. अनेक शेतकरी नेत्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्या घटनेचा अखिल भारतीय किसान सभा व समविचारी संघटनांच्यावतीने निषेध करण्यात आला. याप्रसंगी अशोक सोनारकर, राहुल मंगळे, संजय सुने, संजय मंगळे, विलास खासबागे, प्रकाश नवले, अरुण दाभेकर, नरेंद्र फसाटे, धीरज भोजने, रामराव वडनेरकर, सुनील टाकळे, दीपक पाचघरे यांच्यासह तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश काळे, पवन काळमेघ यांची उपस्थिती होती.
__________________________________