गोवंश हत्याबंदीनंतरही कत्तली सुरूच
By Admin | Updated: April 12, 2015 00:25 IST2015-04-12T00:25:25+5:302015-04-12T00:25:25+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी आणली असली तरी पोलिसांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायतीच्या मूक समर्थनाने ..

गोवंश हत्याबंदीनंतरही कत्तली सुरूच
धारणी : संपूर्ण महाराष्ट्रात राज्य शासनाने गोवंश कत्तलीवर बंदी आणली असली तरी पोलिसांच्या आशीर्वादाने व ग्रामपंचायतीच्या मूक समर्थनाने स्थानिक वॉर्ड नं. ५ मध्ये सर्रास घरोघरी जनावरांच्या कत्तली सुरू आहेत. या वॉर्डात रोज बैलांची कत्तल करण्यात येत असताना याकडे तालुका प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत आहे.
शासनाने गोवंश संरक्षण व संवर्धन होऊन त्यांचे दिवसेंदिवस घटत्या प्रमाणात चिंतीत झालेल्या शासनाने क्रांतिकारी पाऊल उचलत गोवंश बंदी कायदा अंमलात आणला. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कठोर दंड व शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु कायद्याचे पालन करण्याकडे पोलीस, ग्रामपंचायत, पशुधन अधिकारी यांचे कमालीचे दुर्लक्ष आहे. यामुळे पशुधनाची अवैध कत्तल होत आहे.
शहरातील वॉर्ड नं. ५ मेळघाट टॉकीज मागील भागापासून कोंडवाड्यापर्यंत अनेक घरांत गोवंश कत्तलीचे काम सुरू आहे. घराच्या दाराजवळच मांस ठेवून विक्री करण्यात येत आहे. या गंभीर बाबीकडे प्रशासनातील अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. (तालुका प्रतिनिधी)
कत्तलीसाठी जनावरे मध्य प्रदेशातून आणले जाते
तापी नदीच्या पात्रातून खाऱ्या, टिंगऱ्या या गावातून शहराच्या पश्चिमेकडील शेतांमध्ये हे जनावरे रात्री थांबविली जातात. अगदी पहाटे ही जनावरे नियोजित कत्तलस्थळी पोहोचविले जातात. हा प्रकार नित्याचा असून याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.