मारेकरी निघाला अट्टल चोरटा

By Admin | Updated: October 5, 2016 00:21 IST2016-10-05T00:21:15+5:302016-10-05T00:21:15+5:30

बडनेरानजीक झालेल्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पंकज गोंडाणे याने तब्बल ५१ घरफोडी केल्याची कबुली दिली.

The killer left the stolen secret | मारेकरी निघाला अट्टल चोरटा

मारेकरी निघाला अट्टल चोरटा

१८० ग्रॅम सोने, १ किलो चांदी जप्त : ५१ घरफोडींची कबुली
अमरावती : बडनेरानजीक झालेल्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पंकज गोंडाणे याने तब्बल ५१ घरफोडी केल्याची कबुली दिली. यामध्ये नागपूरमधील ३५ व अमरावतीमधील १६ घरफोडींचा समावेश आहे. आरोपींवर हॉटेल अ‍ॅनेक्सचा वेटर अजित रमेश नाईकची चाकू भोसकून हत्या केल्याचा आरोप आहे. आरोपी पंकजने दिलेल्या कबुलीनंतर पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक करून १८० ग्रॅमचे सोन्याचे दागिने व १ किलो चांदी जप्त केली आहे.
२४ सप्टेंबर रोजीच्या रात्री आरोपी सतीश पारवे (३०,रा.जेवडनगर) व त्याचा मित्र पकंज गोंडाणे हे दोघेही हॉटेल अ‍ॅनेक्समध्ये जेवणासाठी गेले होते. जेवणाच्या बिलावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी अजित रमेश नाईक याच्यासह सचिन वानखडे व संदीप पाटील यांच्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात अजित नाईकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अन्य दोघे गंभीर जखमी झालेत. याप्रकरणात बडनेरा पोलिसांनी सतीश पारवे व पंकज गोंडाणेला अटक केली. बडनेराचे ठाणेदार दिलीप पाटील यांनी आरोपींची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली असता त्यांनी हत्येसोबतच घरफोडीच्या घटनांची कबुली दिली. पंकज गोंडाणे याने केलेल्या घरफोडीच्या घटनामधील ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे. पकंजने दागिने आरोपी गजानन लक्ष्मण राखोंडे (३९,रा. विजय नगर) याला दिले. त्याने ते प्रवीण लोणकर याला विकले. त्यामुळे दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक, उपायुक्त शशिकुमार मिना व एसीपी मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पीआय डी.एम.पाटील, एपीआय जी.के.मेहेत्रे, पीएसआय बंदखडके, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुलतकर, पोलीस शिपाई दिपक सुंदरकर, मोहन तायवाडे, श्याम तायडे, शंकर मुळे, सुनिल सोळंके, संतोष यादव, संदिप देशमुख, आशिष करपे, सागर सरदार, ईकबाल चव्हाण यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)

Web Title: The killer left the stolen secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.