तीन मुलींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 00:49 IST2017-08-27T00:48:53+5:302017-08-27T00:49:21+5:30
शहरातील तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना शुक्रवार व शनिवारी उघडकीस आल्या.

तीन मुलींचे अपहरण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील तीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना शुक्रवार व शनिवारी उघडकीस आल्या. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी विजय किसन पारिसे (२२,रा.संत कबीरनगर) तर खोलापुरी गेट व भातकुली पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध अपहरणाचे गुन्हे नोंदविले.
शोभा नगरातील मुलगी वडिलांसोबत परगावी जात असताना विजयने भुसावळपर्यंत पाठलाग करून तिला पळविल्याची तक्रार वडिलांनी गाडगेनगर पोलिसात नोंदविली. आसºयातील १६ वर्षीय मुलीला शाळेत जाताना दोन अज्ञातांनी पळवून नेल्याची तक्रार भातकुली ठाण्यात नोंदविण्यात आली. आनंदनगरातील अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याची तक्रार खोलापुरी गेट पोलिसात शनिवारी नोंदविण्यात आली. तीनही प्रकरणांत भादंविच्या कलम ३६३ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.