खरीपाला अडीच लाख क्विंटल बियाण्यांची गरज
By Admin | Updated: April 28, 2016 00:11 IST2016-04-28T00:11:20+5:302016-04-28T00:11:20+5:30
यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. या हंगामासाठी विविध पिकांच्या २ लाख ३४ हजार १८२ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे.

खरीपाला अडीच लाख क्विंटल बियाण्यांची गरज
लगबग वाढली : बीटीच्या साडेदहा लाख पाकीटांची नोंदणी
गजानन मोहोड अमरावती
यंदाचा खरीप हंगाम महिन्यावर आला आहे. या हंगामासाठी विविध पिकांच्या २ लाख ३४ हजार १८२ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. यासाठी कृषी विभागाद्वारे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये १ लाख ४७ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्यांची आवश्यकता आहे तर बीटीसाठी साडेदहा लाख पाकीटांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केले आहे. या व्यतिरिक्त संकरीत कपाशीचे ४ हजार ७२५ क्विंटल बियाणे लागणार आहे.
कृषी विभागाद्वारा यंदाच्या खरीप हंगामासाठी ७ लाख १४ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. जून महिन्यात वेळेवर मान्सूनचे आगमन झाल्यास या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. या हंगामासाठी कृषी विभागाद्वारे बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. संकरीत ज्वारसाठी ३० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी ४८०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. बाजारा पिकासाठी १५ हेक्टर क्षेत्राला ६ क्विंटल बियाणे लागणार आहे. मक्यासाठी १० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. याकरिता १५६० क्विंटल बियाणे लागणार आहे. तुरीसाठी १ लाख २० हजार हेक्टर क्षेत्राला ९,७०० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. मुगासाठी ३५ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. या पिकाला ३५२० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. उडीदासाठी १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी १२५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. भुईमुगासाठी ३ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे व ७५० क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. तिळासाठी १०० हेक्टरला १० क्विंटल बियाणे लागणार आहे. सूर्यफुलासाठी २५० हेक्टर क्षेत्रामध्ये सव्वा क्विंटल बियाणे लागणार आहे. सोयाबीनसाठी २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी १,४७,११८ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. संकरीत कापसासाठी २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले.
वरूड तालुक्यात बीटी पाकीटांची सर्वाधिक मागणी
यंदाच्या खरीप हंगामासाठी साडेदहा लाख बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यामध्ये अमरावती तालुक्यात ४०,००० पाकीटे लागणार आहे. भातकुली ३२५००, नांदगाव ४२५००, चांदूररेल्वे ५२५००, तिवसा ६००००, धामणगाव १,०७,५००, मोर्शी ११००००, वरूड १३२५००, अंजनगाव सुर्जी ९२५००, अचलपूर १०२५००, दर्यापूर १२२५००, चांदूरबाजार १०२५००, धारणी ४७५०० चिखलदरा तालुक्यात ५००० पाकीटांची मागणी नोंदविण्यात आली.
असे लागणार तालुकानिहाय बियाणे
यंदाच्या खरीपासाठी १६६१५५ क्विंटल बियाणे लागेल. यामध्ये अमरावती तालुक्यात १५७०२ क्विंटल, भातकुली १३९२४, नांदगाव २०२८०, चांदूररेल्वे १३२८६, तिवसा १२०२८, धामणगाव ११०९९, मोर्शी १२८५६, वरूड ९६९४, अंजनगाव १०,३९५, अचलपूर ९३७५, दर्यापूर ११२३४, चांदूरबाजार ११०९५, धारणी ८१५५ व चिखलदरा तालुक्यात ७०३४ क्विंटल बियाणे लागणार आहे.
महाबीज देणार ६६,२०० क्विंटल बियाणे
शासनाची अंगीकृत कंपनी असणाऱ्या महाबीज द्वारा यंदा ६६ हजार २०० क्विंटल उपलब्ध होणार आहे. यामध्ये संकरीत ज्वार १८०० क्विंटल, मका ६००, तूर २५००, मूग १०००, उडीद २००, सोयाबीन ६०,०००, संकरीत कापूस १०, सुधारीत कापूस ६० व धान तसेच ईतर पिकांचे ३० क्विंटल बियाणे महाबीज उपलब्ध करणार आहे.
बीटीसाठी साडेदहा लाख पाकीटांची मागणी
कापूस पिकासाठी १,८९,६४० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. मागील वर्षी १,८६,६६५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामासाठी २,१०,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यासाठी साडेदहा लाख पाकीटांची मागणी कृषी विभागाद्वारा नोंदविण्यात आली आहे. यामध्ये बीजी-१ वाणाचे ३७,५०० पाकीटे व बीजी-२ वाणाचे १०,१२,५०० पाकीटांची मागणी नोंदविण्यात आली आहे.