खरीपाचे यंदा उच्चांकी ८२ टक्के कर्जवाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:14 IST2021-09-19T04:14:21+5:302021-09-19T04:14:21+5:30
अमरावती: यंदाच्या खरीपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ९८ टक्के कर्जवाटप आतापर्यत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा ...

खरीपाचे यंदा उच्चांकी ८२ टक्के कर्जवाटप
अमरावती: यंदाच्या खरीपात जिल्ह्यात दशकात सर्वाधिक ९८ टक्के कर्जवाटप आतापर्यत करण्यात आलेले आहे. हा आतापर्यतचा उच्चांक आहे. यामध्ये जिल्हा बँकेने ९८ टक्के वाटप केलेले असताना राष्ट्रीयीकृत बँका ७४ टक्क्यांवरच स्थिरावल्या आहेत. यंदाचे खरीपाचे कर्जवाटप संपल्याने आता बँकामध्ये रबीच्या कर्जवाटपाची लगबग होणार आहे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे माहितीनूसार यंदाचे खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकाना १२०१.११ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना बँकांनी आतापर्यत १,०२,९२१ खातेदारांना ९८८.२६ कोटींचे पीक कर्जवाटप केलेले आहे. ही ८२ टक्केवारी आहे. यापूर्वी २०१५-१६ चे हंगामात ६५ टक्क्यांपर्यत कर्जवाटप केले होते. त्यानंतर यंदा विक्रमी उच्चांकी कर्जवाटप असल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेनी दिली.
यंदाच्या खरीप हंगामात सुरुवातील कर्जवाटपाचा टक्का माघारला होता. मात्र, कर्जमाफीनंतर दीड लाखांपर्यत कर्ज झाल्याने थकबाकीदार शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला. या सर्व शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळाले आहे. या सर्व शेतकऱ्यांना कर्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे जिल्हा समन्वयक जितेंद्र झा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बॉक्स
असे आहे बँकानिहाय कर्जवाटप
राष्ट्रीयकृत बँकाना ६८१.१० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असताना ५२,८१८ शेतकऱ्यांना ५८०.३० कोटींचे कर्जवाटप करण्यात आलेले आहे. ही ७४ टक्केवारी आहे. बँकेद्वारा १५ कोटींच्या कर्जवाटपाचे लक्ष्यांक असतांना १२.२२ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले, ही ८१ टक्केवारी आहे. याशिवाय जिल्हा बँकेने ४०५ कोटींचे लक्ष्य असतांना ४९,०८२ शेतकऱ्यांना ३९५.७४ कोटींचे वाटप केले. ही ९८ टक्केवारी आहे.