पिंगळादेवी गडावर आज 'खापरी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 05:00 AM2020-10-23T05:00:00+5:302020-10-23T05:00:07+5:30

दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारन्डकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा, श्रृंगारासह आराधनेकरिता दाखल झाले आहेत. ७० वर्षीय नारायणराव वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उचलत आहे. देवीच्या भक्ताचे दु:ख दूर व्हावे, त्यांच्यावरील संकटे टळावे, देवीचा आशीर्वाद भक्तांना मिळावा याकरिता खापरीमध्ये होमहवन केले जाते. आतमध्ये कापुराचा दीप अग्निदेवतेला साक्षी मानून प्रज्वलित केले जाते.

'Khapri' on Pingaladevi fort today | पिंगळादेवी गडावर आज 'खापरी'

पिंगळादेवी गडावर आज 'खापरी'

googlenewsNext
ठळक मुद्देतप्त मडके घेऊन प्रदक्षिणा : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरात भक्तांचा शुकशुकाट

कैलास ठाकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
लेहेगाव : मातीच्या मडक्याला शुद्ध करून अग्निदेवाच्या साक्षीने पिंगळदेवीसमोर सप्तशतीच्या पठणात १६ प्रकारच्या सामग्रीचे हवन आणि होमहवनाने तप्त झालेल्या मडके म्हणजे ह्यखापरीह्ण. ही खापरी पिंगळाई गडावर २३ ऑक्टोबरला अष्टमी-नवमीला रात्री १२ वाजता उचलली जाणार आहे.
अंगावर शहारे आणणारा भक्तांना आश्चर्यचकित असा हा सोहळा आहे. लालबुंद खापरी पुजारी तळहातावर, डोक्यावर घेऊन सुसाट वेगाने देवीला प्रदक्षिणा लावतो. तरीही त्याच्या तळहाताला, डोळ्याला कुठलीच इजा होत नाही, हे विशेष.
दोनशे वर्षांच्या परंपरेनुसार खापरीचा कार्यक्रम होत आहे. ब्राम्हण पुजारी नारायणराव शंकरराव मारन्डकर हे कुटुंबासह नवरात्र महोत्सवात पिंगळादेवीची पूजाअर्चा, श्रृंगारासह आराधनेकरिता दाखल झाले आहेत. ७० वर्षीय नारायणराव वयाच्या चौदाव्या वर्षापासून खापरी उचलत आहे. देवीच्या भक्ताचे दु:ख दूर व्हावे, त्यांच्यावरील संकटे टळावे, देवीचा आशीर्वाद भक्तांना मिळावा याकरिता खापरीमध्ये होमहवन केले जाते. आतमध्ये कापुराचा दीप अग्निदेवतेला साक्षी मानून प्रज्वलित केले जाते. सप्तशक्तीचा पाठ होतो. १६ प्रकारच्या सामग्रीचे हवन सोबतच तुपाची आहुती दिली जाते. चार तासांपेक्षा अधिक वेळ हवन होत असल्याने मडके लालबुंद होतात. या पात्रालाच ह्यअंबादेवीची खापरीह्ण म्हटले जाते. ही खापरी नारायणराव मारन्डकर तळहातावर किंवा डोक्यावर घेतात. त्यावेळी त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबातील व्यक्ती पेटती मशाल घेऊन चालतात. ढोलटाळांच्या गजरात सुसाट वेगाने देवीच्या मंदिराला पाच वा अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात. अंगावर शहारे आणणारा हा प्रकार अनुभवण्यासाठी विदर्भ, परप्रांतातून भाविक येथे हजेरी लावतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भक्ताच्या अनुपस्थितीत हा पारंपारिक सोहळा शुक्रवारी पार पडणार आहे. यावर्षी नवरात्र उत्सवात प्रशासनाने व पोलीस प्रशासनाने गडावरील मंदिरच नव्हे तर संपूर्ण पिंगळादेवीचा गडच बंद केला आहे. त्यामुळे संस्थानचे फार मोठे आर्थिक नुकसान झाले असून दुकाने व बेलफूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ५०० वर्षानंतर पिंगळादेवीचे मंदिर बंद करण्याची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया एका वृद्ध भक्ताने दिली.

Web Title: 'Khapri' on Pingaladevi fort today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.