पोलीस विश्रामगृहाच्या वादावरून खाकी व खादी समोरासमोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:10 IST2021-06-29T04:10:25+5:302021-06-29T04:10:25+5:30
धारणी : चिखलदरा येथील पोलीस विश्रामगृहाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक प्रतिनिधी म्हणून आमदारांना डावलल्यामुळे त्याच्या समर्थकांत तीव्र नाराजीचे वातावरण ...

पोलीस विश्रामगृहाच्या वादावरून खाकी व खादी समोरासमोर
धारणी : चिखलदरा येथील पोलीस विश्रामगृहाच्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी स्थानिक प्रतिनिधी म्हणून आमदारांना डावलल्यामुळे त्याच्या समर्थकांत तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. आज त्यांच्या समर्थकांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन देऊन यासाठी जबाबदार असणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे.
रविवारी चिखलदरा येथील हरिकेन पॉईंट येथे बांधण्यात आलेल्या पोलीस विश्रामगृहाचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु स्थानिक प्रतिनिधी म्हणून आमदार राजकुमार पटेल यांना निमंत्रण देण्यात आले नसल्यामुळे आमदारांनी याविरुद्ध हक्क भंग दाखल करण्याची लोकमतशी बोलताना सांगितले. या घटनेचे काळे फीत लावून त्यांच्या समर्थकांनी निषेध केले. निवेदन देताना रोहित राजकुमार पटेल, श्रीपाल पाल, विनोद वानखडे, राजा पाटील, अल्ताफ डोसानी, सचिन पटेल, सुरेंद्र देशमुख, संतोष चौबे, सुमित चौथमल, कालू मालवीय, रोहित पाल, कमल ठाकूर उपस्थित होते.