कौडण्यपुरात कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 13:05 IST2017-10-28T13:01:41+5:302017-10-28T13:05:55+5:30
विदर्भकन्या देवी रुमिणीचे माहेर असलेल्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यापूरात कार्तिक पौणिर्मा यात्रा महोत्सवला सुरूवात झाली आहे.

कौडण्यपुरात कार्तिक पौर्णिमा यात्रा महोत्सव
आॅनलाईन लोकमत
अमरावती : विदर्भकन्या देवी रुमिणीचे माहेर असलेल्या अमरावतीच्या श्री क्षेत्र कौंडण्यापूरात कार्तिक पौणिर्मा यात्रा महोत्सवला सुरूवात झाली आहे. या महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी दहीहाडीला ‘पंढरीराया श्री विठ्ठल’ दीड दिवसासाठी पाहुणा म्हणून येत असल्याची आख्यायिका आहे.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून हजारो लोक उपस्थित राहणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून पालख्यांचे आगमण होणार आहे. कार्यक्रमाची सांगता जगतगुरु रामराजेशवरायचार्य महाराजांच्या उपस्थितीत पार पडेल. ५ नोव्हेंबरला दहीहांडीचा कार्यक्रम होईल.
दैनंदिन कार्यक्रमात हरिपाठ, काकडा, भजन, कीर्तन, सामुदायिक प्रार्थना आणि ‘श्री’ची पूजा होणार आहे. दहीहंडीच्या दिवशी सकाळी ६ वाजता श्री विठ्ठल-रुख्मिणीची शासकीय महापूजा होणार असून याचा मान नागपूर येथील धनश्री व सुधीर दिवे यांना मिळाला आहे. भाविकांच्या राहण्याची सुविधा करण्यात आली आहे.