सुंदर गाव योजनेत कामनापूर प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:21 IST2021-02-18T04:21:55+5:302021-02-18T04:21:55+5:30

धामणगाव रेल्वे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेत ...

Kamnapur first in Sundar Gaon Yojana | सुंदर गाव योजनेत कामनापूर प्रथम

सुंदर गाव योजनेत कामनापूर प्रथम

धामणगाव रेल्वे :

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात सन २०१९-२० या कालावधीत राबविण्यात आलेल्या आर.आर. आबा पाटील सुंदर गाव योजनेत तालुक्यातील कामनापूर घुसळी हे गाव तालुकास्तरावर प्रथम आले आहे.

तालुक्यातील पाच गावांची पाहणी जिल्हा समितीने केली होती. त्यापैकी दोन हजार लोकवस्तीच्या कामनापूर येथे विविध योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासन व पदाधिकारी करीत आहेत. त्यांच्या परिश्रमाचे पुरस्काराच्या रूपाने चीज झाले आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मोहन घुसळीकर, गटविकास अधिकारी माया वानखडे, पंचायत विस्तार अधिकारी किशोर चव्हाण, ग्रामसेवक मनीष सावळे, सुभाष डबले, अरविंद पनपालिया, सुनील वैद्य, संजय वानखडे, आरोग्य सेवक मनोज सरदार तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांनी समाधान व्यक्त केले.

--------------

Web Title: Kamnapur first in Sundar Gaon Yojana