‘एमओएच’साठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2019 06:00 IST2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:36+5:30
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे हे रजेवर असल्याने त्यांना हे आदेश मिळालेले नाहीत, असे सांगण्यात आले.

‘एमओएच’साठी रस्सीखेच
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी विशिष्ट अधिकाऱ्यालाच प्रभार द्यावा, यासाठी महापालिकेतील भाजपपक्षाचे एक पदाधिकारी प्रयत्नशील आहे. मात्र, आयुक्त संजय निपाणे ठाम असल्याने त्यांची डाळ शिजलेली नाही. दरम्यान या पदासाठी प्रशासनाने जाहिरात दिलेली आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यमान एमओएच डॉ. विशाल काळे यांचेद्वारा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान व आयुक्तांच्या आदेशाला स्थगनादेश मिळण्यासाठी न्यायालयात अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारीपदासाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी विद्यमान एमओएच विशाल काळे यांच्या सेवा समाप्तीचे आदेश दिलेत. दरम्यान काळे हे रजेवर असल्याने त्यांना हे आदेश मिळालेले नाहीत, असे सांगण्यात आले. आपली नियुक्ती ही सक्षम पॅनलने केली असल्याने यात गैर काहीही नाही व यामध्ये माझा कोणताही दोष नाही. त्यामुळे माझ्या हा अन्याय असल्याने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, तसेच आयुक्तांच्या निर्णयालाही स्थगनादेश द्यावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती, डॉ.विशाल काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
या सर्व प्रकरणांत पुन्हा ‘त्या’ अधिकाºयाला प्रभार द्यावा, यासाठी भाजपक्षाच्या महापालिकेच्या एक नेता व त्यांच्याच प्रभागातील स्वच्छता कंत्राटदार महापालिका प्रशासनावर दबाव आणत असल्याची विश्वसनीय माहिती आहे. गतवर्षीच्या अनुभवानंतर आयुक्त याबाबत कुठलीही रिस्क घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे या महिण्यातच निवड प्रक्रियेत पात्र असणाºया अधिकाऱ्याच्या हाती आरोग्य विभागाची कमान दिली जाईल.
प्रलंबित बिले हेच कारण
विद्यमान एमओएचविशाल काळे यांनी काही कंत्राटदारांची बिले त्रुटीअभावी रोखून ठेवल्याने त्यांनी काही पदाधिकाऱ्यांच्या साहाय्याने आता प्रभारी एमओएच ठेवण्यासाठी दबावतंत्राचा वापर सुरु केलेला आहे. सर्व पेंडींग आॅलवेल करण्यासाठी या चौकडीला ‘त्या’ प्रभारी अधिकाऱ्यांची गरज असल्यानेच असा डाव खेळला जात आहे. हा सर्व प्रकार महापालिका आयुक्त संजय निपाणे यांच्या लक्षात आल्याने ते आता कुठलीही जोखीम पत्करण्यास तयार नसल्याची माहिती आहे.