अवघ्या ७२ तासांत सुटला चोरीचा गुंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 00:06 IST2017-09-23T00:05:39+5:302017-09-23T00:06:11+5:30
अवघ्या ७२ तासांत मुस्काननगर येथिल धाडसी चोरीेचा गुंता सोडविण्यात नागपुरी गेट पोलिसांनी यश मिळविले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांकडून पोलिसांनी ....

अवघ्या ७२ तासांत सुटला चोरीचा गुंता
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अवघ्या ७२ तासांत मुस्काननगर येथिल धाडसी चोरीेचा गुंता सोडविण्यात नागपुरी गेट पोलिसांनी यश मिळविले आहे. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनांकडून पोलिसांनी ५९ हजारांचे दागिने व ८३ हजारांची रोख हस्तगत केली आहे. ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
मुस्काननगरातीलसै.सादिक सै.शब्बीर यांच्या घरातून चोरट्यांनी १ लाख ९२ हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्याबाबत १८ सप्टंबरला तक्रार करण्यात आली. सै.सादिक हे नागपूर येथून परतल्यानंतर चोरी उघडकीस आली. तपासादरम्यान तिवसा पोलिसांनी अटक केलेल्या नागपूर येथिल दोन अल्पवयीनांचा या चोरीत समावेश असल्याचे दिसून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी मुस्काननगरमध्ये घरफोडी केल्याचे मान्य केले. मात्र, चोरीतील रक्कम व दागिन्यांची बॅग सै.सादिक यांच्या घरामागे टाकून पळ काढल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानंतर अन्य दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याकडून चोरीचा ऐवज लंपास केला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण, एपीआय रोशन शिरसाट, एएसआय बाळापुरे, विलास पोळेकर, विलास धोंडे, गजानान ठाकरे यांनी केली.