महिला अत्याच्याराविरोधात जिजाऊ ब्रिगेड आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:16 IST2021-09-17T04:16:41+5:302021-09-17T04:16:41+5:30

दोषींना कठोर शिक्षेची मागणी, तहसीलदारांना निवेदन अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील दोषींना ताबडतोब शिक्षा देण्याची ...

Jijau Brigade aggressive against women atrocities | महिला अत्याच्याराविरोधात जिजाऊ ब्रिगेड आक्रमक

महिला अत्याच्याराविरोधात जिजाऊ ब्रिगेड आक्रमक

दोषींना कठोर शिक्षेची मागणी, तहसीलदारांना निवेदन

अंजनगाव सुर्जी : महाराष्ट्रात विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अत्याचारातील दोषींना ताबडतोब शिक्षा देण्याची मागणी अंजनगाव सुर्जी येथील जिजाऊ ब्रिगेड शाखेच्यावतीने तहसीलदारांना निवेदनातून करण्यात आली.

राज्यात काही दिवसांपासून महिलांवर बलात्कार व अत्याचाराचे सत्र वाढले आहे. काही घटनांमध्ये पीडित महिलांचा मृत्यूदेखील ओढवला आहे. या घटना अत्यंत अमानवी व घृणास्पद आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये महिलांची विटंबना हा अतिशय लाजिरवाणा प्रकार आहे. यामुळे अशा घटनांमध्ये दोषी आरोपींना ताबडतोब फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष सीमा बोके, तालुका अध्यक्ष स्वाती मानकर, पल्लवी अढाऊ, सारिका मानकर, बबिता कोकाटे, सुनंदा सरोदे, वर्षा सावरकर, रजनी काळमेघ, विजया तुरखडे, करुणा बाजड, शारदा घोगरे उपस्थित होत्या.

Web Title: Jijau Brigade aggressive against women atrocities