अमरावतीचा चेतन सांभाळणार जम्मू काश्मीरात मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:22 IST2017-08-14T23:22:25+5:302017-08-14T23:22:54+5:30

जम्मू काश्मिरच्या सीमेवर शत्रूंसमोर छाती ताणून उभे राहण्याचे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते,

JAMMU & Kashmir Front will hold Amravati's Chetan | अमरावतीचा चेतन सांभाळणार जम्मू काश्मीरात मोर्चा

अमरावतीचा चेतन सांभाळणार जम्मू काश्मीरात मोर्चा

ठळक मुद्देयशप्राप्ती : फिजिओथेरपिस्ट झाला आर्मी कॅप्टन

वीरेंद्रकुमार जोगी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जम्मू काश्मिरच्या सीमेवर शत्रूंसमोर छाती ताणून उभे राहण्याचे प्रत्येक जवानाचे स्वप्न असते, असे स्वप्न साकारण्याची संधी अमरावती जिल्ह्यातील चेतन शेलोटकर या सीआरपीएफच्या जवानाला मिळाली आहे. नुकतीच चेतनची अटॅचमेंट जम्मू काश्मिर, गुलमर्ग येथे ८ मराठा लाईट इन्फ्रंट्रीमध्ये कॅप्टनपदी करण्यात आली आहे.
राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी असलेल्या गुरूकुंज मोझरी येथील चेतन शेलोटकर याने फिजिओथेरपी अभ्यासक्रम पूर्ण के ला. डॉक्टर म्हणून समाजात प्रथितयश नाव मिळवित असताना त्याचे मन काही रमत नव्हते. देशासाठी आपण काहीतरी करावे, ही त्याची तळमळ स्वस्थ बसू देत नव्हती. चेतनने यूपीएससीची परीक्षा दिली. यशही मिळविले अन् त्याचे पोस्टींग २०१३ साली केंद्रीय रिझर्व पोलीस दलामध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून झाले. एक वर्ष ट्रेनिंग झाल्यानंतर मध्यप्रदेशातील शिवपुरी येथे कमांडो कोर्स पूर्ण केला आणि पहिलीच पोस्टींग नक्षलग्रस्त भाग असलेल्या झारखंड येथील लातेहार येथे झाली. येथे आपली जबाबदारी अतिशय चोख पणे चेतनने बजावली. त्याच्या कतृत्वाची व देशप्रेमाची पावती म्हणूनच त्याला भारतीय सैन्याने मराठा लाईट इंफ्रंटीमध्ये कॅप्टनपद देऊ केले आहे. चेतन याला अ‍ॅटचमेंट केल्याचे पत्र नुकतेच मिळाले असून तो येत्या २५ आॅगस्टपासून आपला कार्यभार स्वीकारणार आहे. विशेष म्हणजे, इंडियन मिलिट्री अकादमीमधून सैन्यात प्रवेश घेणाºया अधिकाºयांना ही पोस्टिंग दिली जाते. चेतनला सामाजिक विषयावर लिखानाची आवड आहे. चेतनचे यांचे वडील उदाराम शेलोटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापक तर आई गृहीणी व पत्नी खासगी नोकरीत आहे.

मला मिळालेली संधी प्रत्येक तरूणाला मिळू शकते, यासाठी केवळ इच्छाशक्ती असावी लागते. कठोर परिश्रम व देशप्रेमाची भावना मनात असेल तर सर्व सहज शक्य होते.
- चेतन शेलोटकर,

Web Title: JAMMU & Kashmir Front will hold Amravati's Chetan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.