अंगणवाडी, शाळांमध्ये राबविणार मेळघाटचा जैतादेही पॅटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:34 IST2020-12-04T04:34:52+5:302020-12-04T04:34:52+5:30

फोटो पी ०३ जैतादेही फोल्डर पान २ मग्रारोहयोतून भौतिक विकास, राज्यातील ४० टक्के शाळांचे प्रस्ताव चिखलदरा : चिखलदरा पंचायत ...

Jaitadehi pattern of Melghat to be implemented in Anganwadi and schools | अंगणवाडी, शाळांमध्ये राबविणार मेळघाटचा जैतादेही पॅटर्न

अंगणवाडी, शाळांमध्ये राबविणार मेळघाटचा जैतादेही पॅटर्न

फोटो पी ०३ जैतादेही फोल्डर

पान २

मग्रारोहयोतून भौतिक विकास, राज्यातील ४० टक्के शाळांचे प्रस्ताव

चिखलदरा : चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत जैतादेही शाळेचा परिसर मनरेगातून विकसित करण्यात आला. तो जैतादेही पॅटर्न राज्यातील जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये राबविण्याचे आदेश मग्रारोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी काढले आहेत. जैतादेही पॅटर्नच्या धर्तीवर राज्यातील इतर शाळा अंगणवाडी यांचा भौतिक विकास करणे शक्य होणार आहे.

चिखलदरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी दोन महिन्यांपूर्वी जैतादेही शाळेला भेट देऊन शिक्षक, ग्रामस्थ यांच्याशी चर्चा केली. मनरेगातून शाळा व अंगणवाडी परिसरात बरीचशी कामे घेणे शक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. महत्त्वाची बाब म्हणजे यासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडीला स्वत: जवळून काही खर्च करण्याची आवश्यकता नाही. मनरेगा योजनेच्या निधींवरही कुठली बंधने नाहीत. यामध्ये मजुरी आणि साहित्य, असे दोन भाग असतात.

असा आहे जैतादेही पॅटर्न

जैतादेही जिल्हा परिषद शाळेत गतवर्षी मुलांना सकस व पोषक आहार मिळावा याकरिता शाळा परिसरात परसबागेची निर्मिती करण्यात आली. शालेय परिसर बराच मोठा असल्यामुळे विविध प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्यांची लागवड करण्यात आली. विद्यार्थी व गावातील नागरिकांना लोकांना विविध प्रकारची फळे चाखायला मिळावित, या हेतूने सीताफळ, आंबा, पपई, फणस, आवळा, चिंच, अंजीर, केळी, शेवगा अशी विविध प्रकारची फळझाडे लावण्यात आली.

बॉक्स

यंदा फळझाडासह औषधी वनस्पती

चिखलदरा पंचायत समितीचे बीडीओ प्रकाश पोळ यांच्या मार्गदर्शनात शाळेचे शिक्षक गणेश जामुनकर, मुख्याध्यापक जितेंद्र राठी, सहायक शिक्षिका शुभांगी येवले यांनी यावर्षी चिक्कू, पेरू, बदाम, आवळा, चेरी, लिंबू, करवंद, डाळिंब, अंजीर यासारखी फळझाडे लावली. औषधी वनस्पती बेहाडा, बेल, कवठ, उंबर, पिंपळ, कदंब, वड, जारूळ (ताम्हण), यासारखी झाडे काही दुर्मिळ वनस्पतीसुद्धा लावण्यात येणार आहेत. ज्यांच्याकडे जागा उपलब्ध आहे अशा विद्यार्थ्यांच्या घरी परसबाग निर्मिती केली जाणार आहे. परसबागेसाठी काही बियाणे बीडहून, तर अस्सल देशी वाणाचे जवळपास ५० प्रकार धामणगाव रेल्वेहून आणण्यात आले आहेत.

Web Title: Jaitadehi pattern of Melghat to be implemented in Anganwadi and schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.