जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:00 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:00:13+5:30

मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यातील हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र पहिल्यांदा लॉकडाऊ न झाले आहे.

Jain's provenance Muktagiri 'Lockdown' | जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’

जैनांचे सिद्धक्षेत्र मुक्तागिरी ‘लॉकडाऊ न’

ठळक मुद्देराज्य सीमा सील : सेवाधारींचे वास्तव्य, भाविकांकरिता खोल्या, हॉल ओस

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : श्री दिगंबर जैन सिधक्षेत्र मुक्तागिरी कोरोनाच्या अनुषंगाने पूर्णत: लॉकडाऊन करण्यात आले आहे. राज्य सीमा सील करण्यात आल्या आहेत. या संकटामुळे राज्यासह राज्याबाहेरून येऊ घातलेल्या दोनशे ते अडीचशे जैनधर्मीय भाविकांनी महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर या सिद्धक्षेत्राला भेट देण्यासाठी प्रवास रद्द केला.
मॅनेजिंग ट्रस्टींनी लॉकडाऊ नच्या अनुषंगाने जैनधर्मीय भाविकांना पूर्वकल्पना दिल्यामुळे मुक्तागीरीत कुठलाही भाविक अडकलेला नाही. महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवरील मुक्तागिरी हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र दक्षिण भारताचे शिखरजी म्हणून ओळखले जाते. मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यातील हे अतिप्राचीन सिद्धक्षेत्र पहिल्यांदा लॉकडाऊ न झाले आहे. हे सिद्धक्षेत्र परवाड्यापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी नेहमीच जैनधर्मीय भाविकांची वर्दळ राहते. दूरदुरू न येणारे भाविक या ठिकाणी मुकामाला असतात. लॉकडाऊ नच्या अनुषंगाने सर्व खोल्या, हॉल ओस पडल्या आहेत. सर्वत्र शांतता असून, हे सिद्ध क्षेत्र जणू मानविरहित झाल्यागत बघायला मिळत आहे. या सिद्धक्षेत्री कार्यरत सेवाधारी कर्मचारी तेवढे त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत. ते सोशल डिस्टन्सिंग पाळत जबाबदारी सांभाळून आहेत. परतवाडा-खरपी-धापोडा-मुक्तागिरी या मार्गावरील मध्यप्रदेशातील धापोडा गावाजवळ सीमा सील करण्यात आली आहे. मुक्तागिरीकडे जाण्याची प्रशासनाकडून कुणालाही अनुमाती नाही. यामुळे सेवेकऱ्यांचा परतवाडा शहराशी संपर्क थांबला आहे.
कोरोनाच्या अनुषंगाने बैतुल जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त निर्देशांचे पालन या ठिकाणी केले जात आहे.

मुक्तागिरीला पूर्णपणे लॉकडाऊन आहे. बैतुल जिल्हाधिकाऱ्यांसह स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन केले जात आहे. स्थानिक निवासी सेवाधिकारी कर्मचाºयांव्यतिरिक्त कुणीही त्या ठिकाणी मुक्कामी नाही. कुणासही अनुमती नाही.
- अतुल कळमकर
मॅनेजिंग ट्रस्टी

Web Title: Jain's provenance Muktagiri 'Lockdown'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.