शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ठाण्यात EVM पडले बंद
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
5
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
6
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
7
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
8
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
9
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
10
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
11
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
12
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
13
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
14
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
15
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
16
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
17
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
18
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
19
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
20
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

शेवटी माकडच ते! डोके अडकवून घेतले स्टीलच्या गडव्यात.. प्रयत्नांती मुक्तता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 10:16 PM

स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली.

ठळक मुद्देपिलू दिवसभर आईला बिलगून

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मर्कटलीला करणे माकडाच्या पिलाच्या चांगलेच अंगलट आले. नसत्या उचापती केल्यामुळे स्टीलच्या गडव्यात एका पिलाचे मुंडके अडकले. पिलाच्या आईने गडवा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यश न आल्याने दिवसभर ते पिलू गडव्यातील डोक्यासह आईला बिलगून राहिले. अखेर वनविभागाच्या रेस्क्यू टीमने त्याची सुटका केली.

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मुंदवाडा गावातील बुधवारची ही घटना. नेहमीप्रमाणे माकडाचा कळप शेतालगच्या घरांवर हुंदडू लागला. या कळपात अनेक पिले होती. त्यातील या पिलाने एका स्टीलच्या गडव्यात डोके घातले अन् गडवा त्याच्या डोक्यात अडकला. त्याला समोरचे दिसेनासे झाल्याने तो भेदरला. त्याच्या आईला बाळाची अडचण समजली. तिने गडवा डोक्यातून काढण्याचे नाना प्रयत्न केले. मात्र, काहीच साध्य झाले नाही. घाबरलेले पिलू आईला सोडेना. ते आईच्या कुशीत बिलगून बसले. मुंदवाडा गावातील जगदीश खेडकर यांनी ही घटना अमरावती वनविभागाला कळवली. वनविभागाची चमू तेथे दाखल झाली. तीन तासांच्या प्रयत्नानंतर पिलाला पकडण्यात आले. त्याच्या गळ्यातून गडवा काढण्यात आला व त्याला पुन्हा कळपात सोडले गेले. रेस्क्यू टिमचे अमोल गावनेर यांनी ही माहिती दिली.

रेस्क्यू टीमने लढविली शक्कलरेस्क्यू टिम गुरुवारी सकाळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह गावात पोहोचली. एकूण परिस्थिती पाहून गुंगी आणणारे इंजेक्शन 'ट्रँक्युलायझर' देणे टाळण्यात आले. यावर एक तोडगा काढण्यात आला. या कळपाला थकवायचे ठरले. तीन तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी साडेदहा वाजता एका क्षणी पिलू माकडीणीपासून दूर झाले. त्याचक्षणी रेस्क्यू टिमने पिलास पकडले. आईपासून दूर नेले. त्याच्या डोक्यात अडकलेला स्टिलचा गडवा काढण्यात आला. या रेस्क्यू टिममध्ये पशुवैद्यकीय अधिकारी एच.टी जाधव, अमोल गावनेर, प्रभारीवनपाल मनोज माहूलकर, वनरक्षक सतीश उमप, वनरक्षक वैशाली सांळुके, वनमजूर वैभव राऊत, मनोज ठाकूर, आसिफ पठाण, गावकऱ्यांपैकी जगदीश खेडकर, अब्दुल जाहिद, सोयल शहा, किशोर मेश्राम, सोपान सयाम हे सहभागी झाले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवforest departmentवनविभाग