आयटीआयकडे ३,३६६ अर्ज प्राप्त

By Admin | Updated: July 23, 2014 23:22 IST2014-07-23T23:22:53+5:302014-07-23T23:22:53+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाकरिता १,१२५ जागेसाठी ३३६६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. २८ जुलै पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज प्राप्त

ITI received 3,366 applications | आयटीआयकडे ३,३६६ अर्ज प्राप्त

आयटीआयकडे ३,३६६ अर्ज प्राप्त

२८ जुलैपासून प्रवेश प्रक्रिया : अर्ज भरण्याची डेडलाईंन संपली
अमरावती : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेशाकरिता १,१२५ जागेसाठी ३३६६ आॅनलाईन अर्ज प्राप्त झाले. २८ जुलै पासून प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे. यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश अर्ज प्राप्त झाल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना शासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रवेशापासून वंचित राहावे लागू शकते.
आयटीआय प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून सुरु करण्यात आल्यावर आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता विद्यार्थ्यांची एकच धावपळ सुरू झाली होती.२२ जुलै आॅनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने जिल्ह्याभरातील विद्यार्थ्यीची आॅनलाईन अर्ज भरण्याकरिता मोर्शी मार्गावरील आयटीआयमध्ये विद्यार्थ्यांची प्रंचड गर्दी झाली होती. तसेच शहरातील अन्य संगणकीय केंद्रावर विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती.
अमरावती जिल्ह्यात आयटीआय प्रवेशाकरिता १,१२५ विद्यार्थ्यांची क्षमता असून ४७ तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांना विविध ट्रेडमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र यावर्षी क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आयटीआयकडे प्राप्त झाल्याने यामधील काही विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. खासगी क्षेत्रामध्ये व्यवसाय प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांची शासकीय संस्थेमध्ये प्रवेश मिळविण्याकरिता धाव घेतात. मात्र यंदा विद्यार्थी संख्या अधिक असल्याचे दिसून येते. येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये १ वर्षाच्या कोर्ससाठी १२ अभ्यासक्रम असून दोन वर्षांकरिता १७ अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

Web Title: ITI received 3,366 applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.