अपघातग्रस्तांना मदत करणे ठरणार नाही त्रासदायक
By Admin | Updated: August 2, 2015 00:35 IST2015-08-02T00:35:02+5:302015-08-02T00:35:02+5:30
रस्ता अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी काही नियम तयार केले जात आहे.

अपघातग्रस्तांना मदत करणे ठरणार नाही त्रासदायक
अमरावती : रस्ता अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून वाचविण्यासाठी काही नियम तयार केले जात आहे. नियम तयार होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश शासनाला दिले आहेत. त्यामुळे आता अपघातात जखमींना मदत करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
रस्ता अपघातात मदत करणाऱ्या नागरिकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने शासनाला काही निर्देश दिले होते. त्यानुसार काही नियम तयार करण्याची प्रक्रीया सुरु झाली असून नियम तयार होईपर्यंत काही निर्देश जारी करण्यात आले आहे. शहरात दररोज अनेक अपघात घडतात, त्यामध्ये जखमींच्या मदतीला अनेक जण धावून जाण्याची तयारी करतात. मात्र, पोलीस कारवाईमुळे बहुतांश नागरिक मदत करणे टाळत असल्याचे निदर्शनास आले आहे.
अपघातात मदत करणाऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये, या उद्देशाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने काही निर्देश जारी केले आहे. अपघातात मदत करणाऱ्या चांगल्या व्यक्तिंना प्रोत्साहित करण्याकरिता हे निर्देश जारी करण्यात असून वाहन चालकाचे कलम १३४ मोटार परिवहन अधिनियम नुसार जबाबदारीस त्यामुळे बांधा येणार नाही. (प्रतिनिधी)