शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर फडकला तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:00 AM

शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, मशीद, बुद्ध विहार या सर्व धार्मिक स्थळांवरही ध्वजारोहण करण्यात आले. गावातील प्रत्येक घरावर नागरिकांनीही तिरंगा फडकविला.

ठळक मुद्देबच्चू कडूंची संकल्पना : प्रजासत्ताक दिनी तीन रंगांमध्ये रंगले बेलोरा

चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे दहा वर्षांपासून आमदार बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून तिरंगा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा २६ जानेवारीला मंदिर, मशीद, बुद्ध विहारसह ७०० घरांवर तिरंगा फडकला. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या या महोत्सवानिमित्त संपूर्ण गाव तिरंगामय झाले होते. ना. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील ‘एक गाव तिरंग्याचे’ म्हणून बेलोरा हे राज्यातील एकमेव गाव ठरले.‘असेल तुला भगवा प्यारा, असेल तुझा हिरवा न्यारा, असेल तुझा निळा प्यारा, मात्र सर्वात उंच तिरंगा आपला’ या संकल्पनेतून बेलोरा ग्रामपंचायततर्फे दरवर्षी तिरंगा महोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ग्रामपंचायतच्यावतीने घरोघरी या महोत्सवाच्या अक्षता वाटून सोहळ्याला येण्याचे निमंत्रण देण्यात आले. शासकीय कार्यालय, शाळा-महाविद्यालयांसोबतच प्रत्येक घरावर तो डौलात फडकवा, ही संकल्पना ग्रामपंचायतने प्रत्यक्षात आणली. त्यानुसार सकाळी सर्वप्रथम द्रौपदाबाई देशमुख विद्यालयावर ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर गावातून तिरंगा रॅली काढून गावातील सर्व मंदिर, मशीद, बुद्ध विहार या सर्व धार्मिक स्थळांवरही ध्वजारोहण करण्यात आले. गावातील प्रत्येक घरावर नागरिकांनीही तिरंगा फडकविला.ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा ग्रामसचिवालयावर झाला. या ठिकाणी ग्रामस्थ शांताबाई कैतवर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या तिरंगा महोत्सवाला ग्रामसचिव जयंत मानकर, सरपंच दीपाली गोंडीकर, उपसरपंच सचिन पावडे, स्वप्निल भोजने, भैया ठाकरे, तुषार देशमुख, श्याम कडू, गौरव झगडे यांच्यासह महिला-पुरुषांसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रसांस्कृतिक सोहळ्यात सहभागी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतच्यावतीने प्रमाणपत्र देण्यात आले. या तिरंगा महोत्सवप्रसंगी सर्वात उंच तिरंगा गावातील पुंजाजी महाराज व मारुती महाराज मंदिराच्या कळसावर फडकविण्यात आला होता. प्रथमच गावातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यात आला होता.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूRepublic Dayप्रजासत्ताक दिन