शहरं
Join us  
Trending Stories
1
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
2
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
3
LPG Price Hike: या वर्षी १५०० रुपयांपर्यंत वाढले कमर्शिअल सिलिंडरचे दर; का वाढले LPG चे रेट?
4
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
5
व्यावसायिकनंतर ५ किलोच्या सिलेंडरच्या किमतीतही मोठी वाढ, आता मोजावे लागणार एवढे रुपये
6
HSC Result 2026 Date: बारावीचा निकाल अवघ्या काही तासांवर! रिझल्ट कुठे आणि कसा पाहायचा? A टू Z माहिती
7
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
8
"तू बिकीनी घाल, मला तुला 'तसं' पाहायचंय..."; दिग्दर्शकाने अभिनेत्रीकडे केलेली विचित्र मागणी
9
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
10
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
11
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
12
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
13
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
14
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
15
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
16
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
17
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
18
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
19
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
20
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्तरपत्रिका कचऱ्यात’ मुद्दा सिनेटमध्ये गाजणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले.

ठळक मुद्देमनीष गवर्इंचा पुढाकार : भविष्याशी खेळणाऱ्यांवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कचऱ्यात उत्तरपत्रिका आढळल्याचा मुद्दा येत्या २७ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सिनेटमध्ये गाजणार आहे. राज्यपालनामित सिनेट सदस्य मनीष गवई यांनी याबाबत पुढाकार घेतला असून, औचित्याच्या मुद्दा ठरवित याविषयी सांगोपांग चर्चा करण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकमेकांशी बोलताना दिसून आले. मात्र, सिनेट सदस्य मनीष गवई यांनी हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. विद्यापीठ हे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविणारे साधन मानले जाते. अशा ठिकाणी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सुरक्षित ठेवल्या जात नसतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे सुरक्षित असणार, असा प्रतिप्रश्न मनीष गवई यांनी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांना दिलेल्या निवेदनातून उपस्थित केला आहे.मनीष गवई यांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. मूल्यांकनात त्रुटी, उशिराने निकाल, परीक्षा केंद्रांवर वेळेत प्रश्नपत्रिका न पोहोेचणे, परीक्षेच्या वेळापत्रकात चुका, गुणपत्रिकांमध्ये गोंधळ अशा एक ना अनेक मुद्द्यांवर परीक्षा विभाग ‘फेल’ ठरला आहे. परीक्षेच्या ‘एन्ड टू एन्ड’ आॅनलाइन कामांची धुरा सांभाळणाºया माइंड लॉजिक एजन्सीच्या करारनाम्यावर गवई यांनी आक्षेप नोंदविला आहे. परीक्षा विभागाच्या गलथान कारभारामुळे उत्तरपत्रिका कचºयात गेल्याचा आरोप सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केला आहे.उत्तरपत्रिका कचऱ्यात कशा गेल्यात? याप्रकरणी दोषींवर कारवाईसाठी कुलगुरूंना निवेदन सादर करण्यात आले आहे. हा मुद्दा औचित्याचा ठरवून सिनेटमध्ये या विषयावर मुद्देसूद चर्चेद्वारे घणाघात करण्यात येणार आहे.- मनीष गवई, सिनेट सदस्य अमरावती विद्यापीठ.

टॅग्स :universityविद्यापीठ