महापालिका शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम
By Admin | Updated: July 30, 2014 23:48 IST2014-07-30T23:48:11+5:302014-07-30T23:48:11+5:30
महापालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी नियमित वेतन मिळावे, ही मागणी अनेक महिन्यांपासून रेटून धरली आहे. सोमवारी शिक्षकांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेऊन वेतन नियमित मिळत नसल्याने

महापालिका शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न कायम
अमरावती: महापालिका शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांनी नियमित वेतन मिळावे, ही मागणी अनेक महिन्यांपासून रेटून धरली आहे. सोमवारी शिक्षकांच्या संघटनांनी आयुक्तांची भेट घेऊन वेतन नियमित मिळत नसल्याने निर्माण होणाऱ्या समस्या आणि व्यथा मांडल्या. मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्याने शिक्षकांची ही न्यायिक मागणी पूर्ण करण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अखिल भारतीय प्राथमिक संघाच्या नेतृत्वात शिक्षकांनी आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. यावेळी शिक्षकांनी प्रशासनाकडून मिळणाऱ्या असहकार्याचा पाढा वाचला. राज्य शासन आणि महापालिका प्रशासन असे संयुक्तपणे ५० टक्के तत्त्वावर शिक्षकांचे वेतन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मात्र आॅनलाईन वेतन प्रणाली सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला असताना या निर्णय प्रक्रियेची कार्यवाही व्यवस्थितरित्या करण्यात आली नसल्याने शिक्षकांना शासनाकडून वेतनाची रक्कम प्राप्त होत नसल्याचा आरोप शिक्षकांनी केला.
यावेळी आयुक्तांनी शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या. आर्थिक परिस्थिती सुरळित झाल्यानंतर शिक्षकांचे नियमित वेतन देण्याची हमी त्यांनी घेतली. वेतनाव्यतिरिक्त शिक्षकांनी काही समस्या मांडण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर स्वतंत्र बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी शिक्षकांना आश्वासित केले. यावेळी उपायुक्त विनायक औगड, रमेश मवासी, शिक्षणाधिकारी सविता चक्रपाणी, प्रभारी लेखापरिक्षक राहुल ओगले, लेखापाल शैलेंद्र गोसावी, ताजी, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या व्यथा मांडतावेळी योगेश पखाले, सीमा ठाकू र, वनितव सावरकर, गोपाल कांबळे, चेतना बोंडे, संध्या वासनिक, गोपाल अभ्यंकर, सुधीर धोत्रे, कविता कांबळे, मीनल ठाकरे, निलीमा लव्हाळे, प्रतिभा कोळवते, रवी हरणे, सुरेखा पेंदाम, रुपाली तळेगावकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)