स्थायीत गाजला दांडीबहाद्दरांचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 06:01 IST2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:29+5:30
स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुंपण विनापरवानगी काढल्याचा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला.

स्थायीत गाजला दांडीबहाद्दरांचा मुद्दा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा परिषदेत स्थायीच्या सभेला विनापरवानगी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांचा मुद्दा गुरुवारी गाजला. विविध सभा, बैठकांना अनेक अधिकारी हे अध्यक्ष व सीईओंना न सांगताच गैरहजर राहतात. परिणामी पदाधिकाऱ्यांना पुढील सभेपर्यंत उत्तराची प्रतीक्षा करावी लागते. अशा अधिकाºयांना मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तंबी दिली.
स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अडगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे कुंपण विनापरवानगी काढल्याचा मुद्दा सुहासिनी ढेपे यांनी मांडला. यावर दोषीविरुद्ध फौजदारी कारवाईचे आदेश बीडीओंना देण्यात आले. याशिवाय येणस येथील सिमेंट रस्त्याच्या लोकेशनचा मुद्दाही गाजला. यातील दोषींवर कारवाईचे आश्वासन सीईओंनी दिलेत. सभेला उपाध्यक्ष विठ्ठल चव्हाण, सभापती बाळासाहेब हिंगणीकर, दयाराम काळे, प्रियंका दगडकर, पूजा आमले, विरोधी पक्षनेता रवींद्र मुंदे, सदस्य महेंद्रसिंह गैलवार, अभिजित बोके यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
शाळांच्या थकीत देयकांचा मुद्दा गाजला
जिल्हा परिषदेच्या जिल्हाभरातील अनेक शाळांमध्ये वीज देयकांची रक्कम थकीत असल्याने बहुतांश शाळांमध्ये वीजपुरवठा खंडित आहे. हा मुद्दा सदस्य सुनील डिके यांनी मांडला. यावर संबंधित ग्रामपंचायतींना शाळेच्या थकीत वीज देयके भरण्याबाबत पुन्हा आदेश देण्याचे आश्वासन सीईओ अमोल येडगे यांनी दिले.