शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

केवळ मुंबई, पुणे, नागपूर म्हणजेच महाराष्ट्र राज्य आहे काय...?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 17:57 IST

Amravati : माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांचा संतप्त सवाल

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महाराष्ट्र म्हणजे केवळ मुंबई, पुणे आणि नागपूरच आहे काय...? असा संतप्त सवाल उपस्थित करून विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाणी पुसल्याचे ताशेरे माजी अर्थ राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ओढले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी संसदेत वर्ष २०२४-२५ करिता सादर केलेल्या अर्थसंकल्पात एका बाजूने विद्यमान सरकारला टेकू दिलेले आंध्र प्रदेश व बिहारवर प्रचंड निधीचा वर्षाव करण्यात आलेला आहे. याउलट केंद्रीय करांमध्ये सर्वाधिक वाटा देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला सपशेल पाने पुसली. यावर 'कोण म्हणतो काहीच नाही..?' असा कोडगा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना विचारला. वस्तुतः महाराष्ट्रातील केवळ मुंबई, पुणेनागपूर येथील मेट्रो प्रकल्प, मुंबई अर्बन ट्रान्स्पोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) नागपूर मेट्रो, नागपूर नाग नदी प्रकल्प, पुणे मेट्रो, पुणे मुळा-मुठा संवर्धन प्रकल्प यांना वगळता विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्राला कोणतीही आर्थिक तरतूद करण्यात आलेली नाही.

विदर्भासाठी सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला फुटकी कवडीसुद्धा दिली नाही. शेतकऱ्यांसाठी साधे पॅकेज तर सोडा, याबद्दल अवाक्षरही अर्थसंकल्पात नाही. याऊलट मुंबई, पुणे, नागपुरातील प्रकल्पांकरिता साधारणतः ५३३१ कोटी रुपये तर याउलट विदर्भ, मराठवाडा येथील सिंचन प्रकल्पांसाठी केवळ ६०० कोटींची तरतूद केली आहे. विदर्भ, मराठवाड्याच्या सिंचनाचा अनुशेष अद्यापही भरून निघालेला नसताना किमान एकरकमी ५००० कोटी रुपये तरतूद यावर करणे अपेक्षित होते. लोकसभा निवडणुकांमध्ये विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण महाराष्ट्राने भाजपला सपशेल हद्दपार केले. याचा सूड केंद्रातील मोदी-शहा जोडी नागरिकांवर उगवत आहे काय, असा संतप्त सवालसुद्धा या अर्थसंकल्पाच्या तरतुदींवरून डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुखcongressकाँग्रेसAmravatiअमरावतीBudgetअर्थसंकल्प 2024PuneपुणेnagpurनागपूरMumbaiमुंबई