इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू, एप्रिल महिन्यात ७४५ दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:53+5:30
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे. सारीच्या रुग्णांवर येथील वाॅर्ड ५ मध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना कोरोनासमानच लक्षणे असल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी ऑक्सिजनचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी उभारलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमधून या वाॅर्डाकरिता पुरवठा जोडला गेला आहे.

इर्विन रुग्णालयात सारीने ७३ रुग्णांचा मृत्यू, एप्रिल महिन्यात ७४५ दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल ७४५ रुग्णांपैकी ७३ जणांचा सारीने, तर नऊ जण सारीतून कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपचारादरम्यान दगावल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना चाचणी नियमित सुरू असून, पॉझिटिव्ह रुग्णांना सुपर स्पेशालिटीत उपचारार्थ पाठविले जात आहे. सारीच्या रुग्णांवर येथील वाॅर्ड ५ मध्ये उपचार सुरू आहेत. या रुग्णांना कोरोनासमानच लक्षणे असल्याने ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी ऑक्सिजनचा मुलबक प्रमाणात पुरवठा व्हावा, यासाठी उभारलेल्या लिक्विड ऑक्सिजन टँकमधून या वाॅर्डाकरिता पुरवठा जोडला गेला आहे. ऑक्सिजनचा पुरवठा होत असला तरी रुग्णांकडून उपचाराला प्रतिसाद मिळणे हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे.
एप्रिल महिन्यात इर्विन रुग्णालयात जिल्ह्यातील ७४५ रुग्ण सारी आजारावरील उपचारार्थ दाखल झाले. त्यांच्यावर सारीसह अन्य आजारांचा प्रादुर्भाव टाळण्याकरिता कोरोना चाचणी करण्यात आली. पैकी ३९५ रुग्ण ‘सारी टू कोविड पॉझिटिव्ह’ झाले आहेत.
रुग्णांवर उपचार करण्यात आले. मात्र, प्रतिसाद न मिळू शकल्याने नऊ जणांना जीव गमवावा लागला. यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो होऊ शकला नाही.
एकाच दिवशी दोन मृत्यू
सारी आजारावर उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी १४ एप्रिल रोजी एकाचा, २० रोजी एक, २१ रोजी एक, २२ रोजी एक, ३० एप्रिलला एक, तर २४ आणि २८ एप्रिल रोजी प्रत्येकी २-२ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे ७३ अधिक ९ असे एकूण ८२ सारीचे रुग्ण एकाच महिन्यात दगावल्याचा जिल्ह्याला धक्का बसला आहे.