शहरं
Join us  
Trending Stories
1
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
2
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
3
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
5
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
6
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
7
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
8
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
9
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
10
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
11
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
12
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
13
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल
14
वर्क फ्रॉम होम कल्चर संपतंय का? 'या' दिग्गज टेक कंपनीनंही आपल्या कर्मचाऱ्यांना ऑफिसला बोलावलं
15
आयफोन १७ सिरीजमध्ये 'या' गोष्टी मिळणार नाहीत; खरेदी करत असाल तर...
16
रशिया-युक्रेन युद्धात 'या' देशानं मारली उडी; रशियन ड्रोन्स पाडले, F 16 लढाऊ विमाने हवेत झेपावली
17
धनत्रयोदशी-दिवाळीपर्यंत कुठवर पोहोचणार सोन्याचा दर? आता आहे ₹१.१२ लाखांच्या पार, खरेदीपूर्वी पाहाच
18
'ही' छोटी कार आता ३ लाख रुपयांपर्यंत स्वस्त; जीएसटी कपातीमुळे नवीन किंमती जाहीर
19
नेपाळमध्ये लष्कराने सूत्रं हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोची विमान उड्डाणे रद्द
20
महाराष्ट्रात ७०० आरटीओ अधिकाऱ्यांची कमतरता, प्रशासनावर ताण

आयपीएस जालिंदर सुपेकर यांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन

By गणेश वासनिक | Updated: June 7, 2025 18:56 IST

मध्यवर्ती कारागृहात सात जणांचे केले होते निलंबन : खासगी साेहळ्यात उपस्थिती, मग कारागृहात भेट कशासाठी?

गणेश वासनिक अमरावती : पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले कारागृह व सुधार सेवा विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची शासनाने मुंबईत होमगार्डच्या उपमहासमादेशकपदी बदली करून ‘डिमाेशन’ केले आहे. मात्र, पत्नीच्या छळप्रकरणी अमरावती मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त गायकवाड बाप-लेकांना मानसिक त्रास आणि ‘डिमांड’ पूर्ण न करणाऱ्या तुरुंगातील सात जणांचे सुपेकरांनी निलंबन केले होते. त्यामुळे सुपेकरांचे अमरावतीशी ‘फ्रॉड’ कनेक्शन नव्याने समोर आले आहे.

आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्याकडे नागपूर येथील उपमहानिरीक्षकपदाचा अतिरिक्त कारभार असताना, त्यांनी १९ ऑगस्ट २०२३ रोजी अमरावती कारागृहात ‘अनऑफिशियल’ भेट दिली होती. कारागृहात बंदिस्त असलेल्या पुण्यातील हाय प्रोफाइल गायकवाड बाप-लेकांना तुरुंगाधिकाऱ्यांसमक्ष टार्गेट केले होते. ११०० पेक्षा जास्त कैदी असताना, सुपेकरांनी गायकवाड बाप-लेकांचीच भेट का घेतली, हा आता संशोधनाचा विषय ठरत आहे.

गायकवाडांना येरवड्यातून अमरावतीत का हलविले?पत्नीच्या छळप्रकरणी पुणे येथील नानासाहेब गायकवाड आणि मुलगा गणेश गायकवाड हे येरवडा कारागृहात बंदिस्त होते. मात्र, या बाप-लेकांची अचानक पुण्याहून अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. हा निर्णय कोणी, कशासाठी घेतला, याची विशेष चौकशी केल्यास मोठा ‘फ्रॉड’ बाहेर आल्याशिवाय राहणार नाही, असे बोलले जात आहे.

या सात जणांचे केले होते निलंबन अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे अतिरिक्त अधीक्षक भारत भोसले, वरिष्ठ तुरुंगाधिकारी कमलाकर मिरासे, तुरुंगाधिकारी राजेंद्र राठोड, वैद्यकीय आराेग्य अधिकारी डॉ. प्रमोद राजतकर, हवालदार उल्हास साखरे, महिला शिपाई सरिता सरोदे, प्रतिनियुक्तीच्या तुरुंगाधिकारी संघमित्रा शेळके यांचा निलंबनात समावेश होता.

"आराेग्यविषयक अहवाल समाधानकारक नसल्याचा ठपका ठेवत २० मार्च २०२४ रोजी माझे निलंबन केले होते. मात्र, त्यानंतर आयपीएस जालिंदर सुपेकर यांना ही चूक लक्षात येताच पुन्हा तीन महिन्यांनी अमरावतीतच रुजू करून घेतले. मला कोणतीही ‘डिमांड’ केली नव्हती."- डॉ. प्रमोद रोजतकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, नांदुरा.

"नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जालिंदर सुपेकर, मुक्ताई साळुंखे आदींना नोटीस बजावली आहे. नानासाहेब गायकवाड यांची वैद्यकीय तपासणीचे कोर्टाचे निर्देश असताना त्याचे पालन केले जात नाही. सुपेकरांनी अमरावती कारागृहात गायकवाड बाप-लेकांशी भेट घेतली तेव्हा साडेतीन तास अंडा बराकमध्ये काय केले होते, हे समोर आले पाहिजे."- ॲड. निवृत्ती कऱ्हाड, पुणे

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेdowryहुंडाdowry probition actहुंडा प्रतिबंधक कायदाAmravatiअमरावतीCrime Newsगुन्हेगारी