अंबानगरीत इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:13 IST2020-12-06T04:13:26+5:302020-12-06T04:13:26+5:30
अमरावती : वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशन (लंडन) व ॲमेच्युअर पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ...

अंबानगरीत इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धा
अमरावती : वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशन (लंडन) व ॲमेच्युअर पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ डिसेंबरदरम्यान येथील विभागीय क्रीडा इनडोअर स्टेडियममध्ये ‘वर्ल्ड कप २०२० इंटरनॅशनल चॅम्पियनशिप’ महिला व पुरुष गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, त्याचे उद्घाटन शनिवारी सायंकाळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी खासदार आनंदराव अडसूळ अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, ॲमेच्युअर पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुरेश कदम, सचिव दीपक बागुल, कार्यकारी अध्यक्ष तथा स्पर्धेचे मुख्य आयोजक सुनील खराटे यांची उपस्थिती होती. पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान देशातील इंटरनॅशनल खेळाडूंचा सहभाग लाभला होता. विदेशातील १७ खेळाडू तसेच भारतातील ९८ महिला व पुरुष खेळाडू यानिमित्त अंबानगरीत दाखल झाले होते. पुरुषांमध्ये विविध गटातील १९ ते ७० वर्षांपर्यंत खेळांडूचा सहभाग होता, तर यामध्ये ४८ किलो ते ११० किलोवरील वजनगट ठेवण्यात आले होते. महिलांमध्ये १९ ते ७० वर्षांपर्यंत, तर ४६ ते १०० किलोवरील वजनगटात आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी सहभाग घेऊन अमरावतीकरांची मने जिंकली. लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने क्रीडा रसिकांमध्ये उत्साह संचारला होता. प्रास्ताविक सुनील खराटे यांनी केले. संचालन नरेंद्र केवले यांनी केले. आभार दीपक बागुल यांनी मानले.