शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! एकाच महिन्यात वाढली जि.प. शिक्षकांची १४०१ पदे, माहिती अधिकारातून उघड

By गणेश वासनिक | Updated: August 31, 2022 18:41 IST

सांगा, खरे काय ? माहिती अधिकारात दिली १९ हजार ४५२ रिक्त पदे, रोस्टरमध्ये दाखवली १८ हजार ४९ पदे

अमरावती : राज्यभरात जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या नुकत्याच आंतरजिल्हा बदल्या पार पडल्या. आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा परिषद शिक्षकांचे जिल्हानिहाय रिक्त पदांचे  रोस्टर जाहीर करण्यात आले होते. जाहीर केलेल्या रोस्टर नुसार राज्यात मराठी माध्यमाची १६ हजार ७४८ पदे रिक्त दाखविण्यात आली, तर उर्दू माध्यमाची १ हजार ३०१ पदे रिक्त दाखविण्यात आली होती. अशी राज्यभरात एकूण जिल्हा परिषद शिक्षकांची १८ हजार ४९ पदे रिक्त होती. मात्र, एकाच महिन्यात राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची १ हजार ४०१ रिक्त पदांची संख्या वाढल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून पुढे आली आहे.

माहिती अधिकार अधिनियम २००५ नुसार पुणे येथील प्रदीप दराडे यांनी माहिती मागविली होती. त्यानुसार आता राज्यात जिल्हा परिषद शिक्षकांची १९ हजार ४५२ पदे रिक्त असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे येथील जन माहिती अधिकारी सचिन रेमजे यांनी दिली आहे. ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक या 'पीटीआर' नुसार शिक्षकांच्या नेमणुकांना मंजुरी दिली जाते.

सध्या याच पटसंख्येच्या आधारावर जिल्हा परिषदांच्या शाळांत शिक्षकांच्या मंजूर असलेल्या २ लाख १९ हजार ४२८ पदांपैकी १ लाख ९९ हजार ९७६ पदांवर शिक्षक कार्यरत असून तब्बल १९ हजार ४५२ पदे अद्यापही रिक्त आहेत. तर यात महापालिका, नगर परिषद शाळा, छावणी शाळा येथील रिक्त पदांचा समावेश केल्यास राज्यात एकूण शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या ३१ हजार ४७२ एवढी होते. खासगी अनुदानित शाळा, अनुदानित आश्रम शाळा, शासकीय आश्रम शाळा येथील रिक्त पदे ही वेगळीच आहेत.

२०११ पासून शिक्षक भरती नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीच्या निमित्ताने जाहीर केलेल्या रोस्टर नुसार १८ हजारांवर होती. ही रिक्त पदे भरण्याची मागणी राज्य सरकारकडे ट्रायबल फोरम महाराष्ट्र या संघटनेने  काही दिवसांपूर्वीच केली आहे, हे विशेष.प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदेविभाग                 -           मंजूर पदे     -      कार्यरत पदे       -         रिक्त पदेजिल्हा परिषद          -        २१९४२८    -          १९९९७६       -          १९४५२महापालिका शाळा    -      १९९६०       -           ८८६२          -           ११०९८नगर परिषद शाळा     -     ६०३७        -            ५१३६         -            ९०१छावणी शाळा         -       १६६           -              १४५          -             २१एकूण मंजूर पद संख्या  - २४५५९१कार्यरत पदे - २१४११९रिक्त पदे - ३१४७२ग्रामीण व शहरी भागात जिल्हा परिषदांच्या शाळेत गरीबांची मुले, मुली शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची समस्या, बीएड, डीएड बेरोजगार युवकांची समस्या लक्षात घेऊन आणि जिल्हा परिषदांच्या शाळा वाचाव्या म्हणून आम्ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली आहे. 

- रमेश मावस्कर, निवृत्त उपायुक्त, राज्य सचिव ट्रायबल फोरम

टॅग्स :Teacherशिक्षकjobनोकरी