शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

संस्थात्मक विलगीकरण, आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:18 IST

अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष ...

अमरावती : कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातील संस्थात्मक विलगीकरण व आरटी-पीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश जिल्हा टास्क फोर्सचे अध्यक्ष जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी येथे दिले.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी जिल्ह्याच्या स्थितीबाबत नवाल यांनी माहिती सादर केली. या कॉन्फरन्सनंतर जिल्हा टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी, जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी, दिलीप रणमले यांच्यासह महापालिका, आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून दक्षतेचे नियम पाळले न जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे गृह विलगीकरणाऐवजी आता संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्यात यावा. त्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्रे सुरू करण्यात येतील. व्हीएमव्ही महाविद्यालयातील क्वारंटाईन सेंटर तत्काळ सुरू करण्यात यावे. त्याचप्रमाणे वलगाव व नजीकच्या ठिकाणी कार्यरत आरोग्य कर्मचा०यांसाठी नवसारी येथे निवास व्यवस्था करावी, असे जिल्हाधिकारी नवाल म्हणाले.

--------------------------

अमरावती, अचलपूर शहरात रुग्णसंख्या अधिक

अमरावती शहर व अचलपूर शहरात रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने येथे कडक नियम पाळले जावेत, यासाठी यंत्रणांनी कार्यवाही करावी. महापालिका, नगरपालिका यांनी लग्न समारंभात गर्दी आढळल्यास हॉलच्या संचालकावर कठोर कारवाई करावी. बँक्वेट हॉलमध्ये मास्कचे पालनही होत नसेल, तर संचालकावर कारवाई करावी. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागातही नागरिकांकडूनही बेपर्वाई होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सगळीकडे कारवायांचे प्रमाण वाढवावे, असे निर्देश जिल्हाधिका०यांनी दिले. ज्या क्षेत्रात रुग्णांचे आधिक्य आढळून येते, तिथे चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. मात्र, ॲन्टिजेन चाचण्यांऐवजी आरटी-पीसीआर चाचणीलाच प्राधान्य द्यावे. खासगी लॅबमधून ज्या ॲन्टिजेन टेस्ट होत आहेत, त्या बंद कराव्या.

---------------