मध्य रेल्वे आयुक्तांद्वारे बडनेरास्थानकाचे निरीक्षण

By Admin | Updated: September 23, 2016 00:20 IST2016-09-23T00:20:02+5:302016-09-23T00:20:02+5:30

मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य सुरक्षा आयुक्त शुभांशू हे बुधवारी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाच्या निरीक्षण दौऱ्यावर आले होते.

Inspection of Badanarastha by Central Railway Commissioner | मध्य रेल्वे आयुक्तांद्वारे बडनेरास्थानकाचे निरीक्षण

मध्य रेल्वे आयुक्तांद्वारे बडनेरास्थानकाचे निरीक्षण

सुरक्षेसह स्वच्छतेची पाहणी : स्पेशल कोचने आगमन
बडनेरा : मध्य रेल्वे मुंबईचे मुख्य सुरक्षा आयुक्त शुभांशू हे बुधवारी अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकाच्या निरीक्षण दौऱ्यावर आले होते. सुरक्षेसह स्वच्छतेची पाहणी करण्यात आली.
सर्वप्रथम आयुक्त सुभांशू यांनी बडनेरा रेल्वे स्थानकावरील रनिंगरुम, रेल्वेच्या अभियांत्रिकी स्थानकाच्या बाहेरील भागाची पाहणी केली. त्यानंतर ते अमरावती येथील पार्सल कार्यालय, पे अ‍ॅन्ड युज, रेल्वे स्थानकाची स्वच्छता मेकॅनिक क्लिनिंग प्रवासी गाड्यांची सुरक्षेसह स्वच्छतेची तपासणी केली. यावेळी अमरावतीचे स्टेशन मास्तर आर.टी. कोटांगळे, बडनेराचे यु.के.अनवेकर, वाणिज्य निरीक्षक व्ही.डी. कुंभारे, मुख्य तिकीट निरीक्षक वकील खान, एस.पी. कुऱ्हाडे, वरिष्ठ खंड अभियंता वाडेकर, विद्युतचे किशोर लोहबरे आदी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यावेळेस उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Inspection of Badanarastha by Central Railway Commissioner