पालकमंत्र्यांनी केली पुरग्रस्त गावांची पाहणी
By Admin | Updated: July 14, 2016 00:21 IST2016-07-14T00:21:57+5:302016-07-14T00:21:57+5:30
जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसानंतर अनेक तालुक्यात पूराने जनजीवन विस्कळीत व शेती पिकांची हानी झाली आहे.

पालकमंत्र्यांनी केली पुरग्रस्त गावांची पाहणी
नागरिकांशी संवाद : सानुग्रह अनुदान, सर्वेक्षणाचे आदेश
अमरावती : जिल्ह्यात झालेल्या संततधार पावसानंतर अनेक तालुक्यात पूराने जनजीवन विस्कळीत व शेती पिकांची हानी झाली आहे.बुधवारी पालकमंत्री प्रवीण पोटे या पुरग्रस्त गावांची पाहाणी केली.
भातकुली तालुक्यातील कामनापूर, जावरा, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज, जवर्डी, चौसाळा या गावातील पुरग्रस्त भागाची पहाणी केली. यामध्ये जावरा, कामनापूर या गावांच्या मध्यभागी वाहणारे रेणुका नदिमुळे पुर परिस्थितीत गावांचा संपर्क तुटतो अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
यावेळी पालकमंत्र्यांनी बाधित नागरिकांना सानूग्रह अनुदान व सर्वेक्षणाचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी किरण गित्ते पालकमंत्र्यांसमवेत होते.