एरंडगाव व मांजरी म्हसला येथील वृक्षारोपणाची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST2021-07-07T04:15:18+5:302021-07-07T04:15:18+5:30
जिवंत रोपाची टक्केवारी अत्यंत कमी आढळून आली असून, रोपांची परिस्थिती वाईट आहे. वृक्षारोपणाचे संगोपन केले गेले नाही. पारडी ते ...

एरंडगाव व मांजरी म्हसला येथील वृक्षारोपणाची चौकशी
जिवंत रोपाची टक्केवारी अत्यंत कमी आढळून आली असून, रोपांची परिस्थिती वाईट आहे. वृक्षारोपणाचे संगोपन केले गेले नाही. पारडी ते मालखेड रस्त्यावरील १९ हजार ९९८ रोपे लावण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्या ठिकाणी झाडांची संख्या निरंक असल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे. हे वृक्षारोपण मग्रारोहयो अंतर्गत झालेले नसून, नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत झाले असल्याचे चौकशी अहवालात नमूद आहे. या चौकशी समितीत निवासी नायब तहसीलदार एम.बी. राठोड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी लक्ष्मण खांडरे, सहायक कार्यक्रम अधिकारी सचिन ठाकरे, तांत्रिक सहायक शिरीष वानखडे होते. यापूर्वी ‘वृक्षारोपणावर लाखोंचा चुरडा’ हे वृत्त ‘लोकमत’ने ११ जूनला प्रकाशित केले होते. आता या चौकशी समितीने सादर केलेल्या या अहवालावरून काय कारवाई होते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.