शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

इंगोले, सिसोदे यांची सभापतिपदी बिनविरोध

By admin | Updated: March 3, 2015 00:18 IST

महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी, परिवहन समिती सभापतीपदी काँग्रेसचे विलास इंगोले,

अमरावती : महापालिकेत सोमवारी पार पडलेल्या स्थायी, परिवहन समिती सभापतीपदी काँग्रेसचे विलास इंगोले, दिव्या सिसोदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अन्य कोणत्याही सदस्यांचा अर्ज सादर नसल्याने इंगोले, सिसोदे यांच्या निवडीची घोषणा केली.महापालिकेच्या स्व. सुदामकाका देशमुख सभागृहात सोमवारी सकाळी ११ वाजता स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया राबविण्यात आली. काँग्रेसचे विलास ंइंगोले यांचाच एकमात्र सभापती पदासाठी अर्ज सादर असल्याने छाननीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची बिनविरोध निवड केली. यावेळी स्थायी समितीच्या १६ पैकी १३ सदस्य हजर होते. तीन सदस्य निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाले नाही. यात भाजपचे तुषार भारतीय, कांचन उपाध्याय, जनविकास- रिपाइं आघाडीच्या कुसूम शाहू यांचा समावेश आहे. स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया आटोपल्यानंतर दुपारी एक वाजताच्या दरम्यान परिवहन समिती सभापती पदाची निवडणूक घेण्यात आली. परिवहन समिती सभापती पदासाठीसुद्धा एकमात्र काँग्रेसच्या दिव्या सिसोदे यांचाच अर्ज सादर असल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सिसोदे या बिनविरोध निवडून आल्याची घोषणा केली. घोषणेनंतर जिल्हाधिकारी गित्ते यांनी नववियुक्त सभापती विलास इंगाले, दिव्या सिसोदे यांचे पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. परिवहन समिती सभापती पदाचा निवडणूकीत १२ पैकी चार सदस्य गैरहजर होते. यात काँग्रेसचे अ. रफिक अ. रज्जाक, कांचन ग्रेसपुंजे, भाजपच्या छाया अंबाडकर, जनविकास- रिपाइं आघाडीचे बाळू भुयार यांचा समावेश आहे. दोन्ही सभापतीपद हे काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने या गोटात जल्लोषाचे वातावरण होते. ढोल ताशांच्या गजर, फटाक्यांची आतषबाजी, गुलाल आणि पिवळा, हिरव्या रंगाची उधळण करुन काँग्रेसने विजयाचा आंनदोत्सव साजरा केला. कांचन ग्रेसपुंजे यांचा राजीनामापरिवहन समिती सभापती पदाच्या दावेदारीतून ऐनवेळी कांचन ग्रेसपुंजे यांना डावलल्या गेल्याने त्यांनी व्यथीत होवून काँग्रेस सदस्यपदाचा राजीनामा थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांना पाठविला आहे. ग्रेसपुंजे यांच्या आरोपानुसार विद्यमान काँग्रेसचे नेतृत्त्व दिशाहिन झाले असून बडनेरा शहरात मागील १५ वर्षांपासून निवडून येत असताना ज्येष्ठ सदस्यांना डावलण्याचे काम सुरु झाले आहे. राजीनाम्याचे पत्र प्रदेश काँग्रेसचे सचिव संजय खोडके, शहराध्यक्ष संजय अकर्ते, पक्षनेता बबलू शेखावत आदींना पाठविले आहे.