श्वानभक्षकांची माहिती द्या, सीपींचे नागरिकांना आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:19 IST2017-08-13T23:19:09+5:302017-08-13T23:19:39+5:30

श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण प्रकरणाची पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी गंभीर दखल घेऊन श्वानभक्षकांची माहिती देण्याचे आवाहन अमरावतीकरांना केले आहे.

Information about shooters, appeal to CP's citizens | श्वानभक्षकांची माहिती द्या, सीपींचे नागरिकांना आवाहन

श्वानभक्षकांची माहिती द्या, सीपींचे नागरिकांना आवाहन

ठळक मुद्देराजापेठ पीआयची कसोटी : कुठलेही दडपण बाळगू नका

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : श्वानचौर्य, श्वानहत्या व श्वानभक्षण प्रकरणाची पोलीस आयुक्त दत्तात्रय मडंलिक यांनी गंभीर दखल घेऊन श्वानभक्षकांची माहिती देण्याचे आवाहन अमरावतीकरांना केले आहे.
हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील परप्रातीयांच्या वसतिगृहात घडलेल्या श्वानभक्षण प्रकरणातील आरोपींना पोलीस कधी अटक करतात, याची प्रतीक्षा अमरावतीकर करीत आहेत. 'लोकमत'ने वृत्त मालिकेतून या प्रकरणातील अनेक तत्थ लोकदरबारात उघड केले. या प्रकरणाचा तपास राजापेठ पोलिसांकडे आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी उशीर करणाºया राजापेठ पोलिसांनी आता तपासातही पिछाडी कायम राखली आहे. प्रकरण गंभीर असताना आणि श्रीनाथवाडी परिसरातील लोकभावना या प्रकरणाशी जुळलेल्या असताना देखील राजापेठ पोलिसांना तपासात यश मिळविता आले नाही. तपास जाणिवपूर्वकरीत्या संथ ठेवण्यात आला असल्याचा आरोप श्रीनाथवाडी परिसरातील नागरिकांचा आहे.
पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ते थेट राजापेठ पोलिसांकडून यासंबंधाने नियमित मागवित आहेत. श्वान चोरले कुणी, कापले कुठे आणि शिजविले कुठे? याबाबतची माहिती तपासातून निष्पन्न करण्याच्या सूचना राजापेठ ठाण्याच्या अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. आवश्यक ते पुरावे गोळा करण्याचेही निर्देशित करण्यात आले आहे. तथापि, राजापेठ पोलिसांनी निर्णायक गती न घेतल्याने तपास सुखर व्हावा, यासाठी पोलीस आयुक्त मंडलिक यांनी नागरिकांनाच पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
नागरिकांना एचव्हीपीएम प्रकरणातील श्वान चौर्य, श्वान हत्या किंवा श्वानभक्षण यापैकी कुठल्याही घटनेबाबत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष माहिती असल्यास त्यांनी राजापेठ पोलिसांना वा थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. माहिती देणाºयाने कुठलेही दडपण वा भीती बाळगू नये, पोलीस त्यांना सर्वत: मदत करेल, असेही पोलीस आयुक्तांनी आश्वस्त केले आहे.
श्वानभक्षणाच्या या गंभीर कृत्याबाबत आता काही संघटना पुढे सरसावल्या आहेत. शनिवारी भाजपा ओबीसी मोर्चा विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना निवेदनही सादर केले आहे. परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या श्वानभक्षण प्रकरणात आरोपींना अटक करण्याची मागणी विद्यापीठ मंडळाच्या पदाधिकाºयांनी केली आहे.

Web Title: Information about shooters, appeal to CP's citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.