शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

साथरोग नियंत्रणाकरिता अधिकारी गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:00 AM

गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आणि साथरोग पसरणार नाही, याकरिता पाण्याने निर्माण झालेले डबके बुजवावे.

ठळक मुद्देपोही येथे अस्वच्छतेचा कळस : टायफॉईड, डेंग्यू रुग्णाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कशिंदी बु : अचलपूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या शिंदी बु. ग्रामपंचायतीतील वॉर्ड ४ अंतर्गत पोही गावात टायफॉईड, डेंग्यू रुग्णाची नोंद झाल्याने जिल्हा हिवताप अधिकारी, सहायक गटविकास अधिकाऱ्यांनी भेट देत गावाची संपूर्ण पाहणी केली.गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली आणि साथरोग पसरणार नाही, याकरिता पाण्याने निर्माण झालेले डबके बुजवावे. खताचे ढिगारे उचलावे. गावामध्ये त्वरित डासअळी प्रतिबंधक धूर फवारणी करावी, असे निर्देश ग्रामसचिवांना पत्राद्वारे दिले.पोही गावातील साथरोगाची व्याप्ती ही या छोटेखानी गावाच्या दृष्टीने चिंतेची आहे. येथे टायफॉईड, डेंग्यू आणि विषमज्वर या आजारांची लागण झाली आहे. यामुळे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. शरद जोगी, डॉ. मुन्द्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मालखेडे, सहायक गटविकास अधिकारी खानंदे, हरम येथील ग्रामविकास अधिकारी योगेश्वर उमक गावात दाखल झाले. ग्रामपंचायतीला गावाच्या स्वच्छतेकरिता त्वरित उपाययोजना राबविण्याचे निर्देश सहायक गटविकास अधिकाºयांनी दिले.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यू