इंडिका झाडावर आदळली
By Admin | Updated: June 14, 2014 01:19 IST2014-06-14T01:19:29+5:302014-06-14T01:19:29+5:30
इंडिका झाडावर आदळल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

इंडिका झाडावर आदळली
अमरावती : इंडिका झाडावर आदळल्याने चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत नया अकोला येथे शुक्रवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली. प्रफुल्ल रामदास बर्वे (३०,रा प्रल्हादपुरा, चांदूरबाजार) असे मृताचे नाव आहे. अपघातात प्रफुल्ल यांचा सहकारी राहुल अशोक रोंघे (२६, तहसील कॉर्टर, चांदूरबाजार) हे गंभीर जखमी झाले. प्रफुल्ल बर्वे व राहुल रोंघे हे दोघे गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजता त्यांच्या एम. एच. २७ ए.सी.४३०० क्रमांकाच्या इंडिका कारने अमरावती येथून चांदूरबाजारकडे जात होते. वलगाव ते चांदूरबाजार मार्गावरील चालक प्रफुल्ल यांचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने इंडिका कार रस्त्याच्या कडेला निंबाच्या झाडावर आदळली. यामध्ये कारच्या दर्शनी भागाचा चुराडा होऊन प्रफुल्ल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातात राहुल हे गंभीर जखमी झाले. तेथील काही नागरिकांना शुक्रवारी सकाळी ६ वाजता अपघात झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी वलगाव पोलिसांना माहिती दिली. सहायक पोलीस उपनिरीक्षक के.के.पंधरे, ज्ञानेश्वर भुजाडे, महेंद्र वलके यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन याप्रकरणी गुन्हा नोंदविला.