शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

‘योगा’च्या बळावर भारत जगाचे नेतृत्व करणार

By admin | Updated: November 6, 2014 22:48 IST

योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे आगामी काळात योगाच्या बळावर भारत देश जगाचे नेतृत्व करेल, असा आशावाद आमदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.

अनिल बोंडे यांचे प्रतिपादन : राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा समारोप अमरावती : योग ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. त्यामुळे आगामी काळात योगाच्या बळावर भारत देश जगाचे नेतृत्व करेल, असा आशावाद आमदार अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.बाराव्या बृहन महाराष्ट्र योग व ३३ व्या राज्यस्तरिय योगासन स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, योगाच्या अभ्यासातून सकारात्मक विचारांची शिदोरी मिळते. त्यामुळे आरोग्य सुदृढ होऊ शकते. स्वामी विवेकानंद, योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांच्या सारख्या महान विभुतींनी मोठया कष्टाने सुरू केलेली योगक्रिया देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. तरीही आतापर्यंत योगाबाबत अनास्था होती. परंतु योगगुरू रामदेवबाबांसारख्या योगसाधकांमुळे योगाला महत्व आले आहे. शहरासोबतच ग्रामीण भागातही योगाचा झपाटयाने प्रसार होत आहे. योगाला महत्व प्राप्त करून देण्यासाठी शासनाने जिल्हा, विभाग, राज्यस्तरावर आणी राष्ट्रीयस्तरावर योग स्पर्धा सुरू कराव्यात, असेही आमदार बोंडे यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाला योग परिषदेचे अध्यक्ष मुकुंद भोळे, हव्याप ्रमंडळाचे प्रधान सचिव प्रभाकर वैद्य, वसंत हरणे, माधुरी चेंडके, सरकार्यवाहक अरूण खोडस्कर, जिल्हा योग असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश बोके, महिला योग असोसिएशनच्या अध्यक्ष अंजली कुथे, सतिश मोहगावकर, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, सुभाष शर्मा आदींची उपस्थिती होती. यावेळी योगक्षेत्रात उकृष्ट कार्यकरणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये सुंदरलाल श्रीवास्तव, इंदुमती कुथे, वामनराव तायडे, गोविंद राऊत, सुधाकर वेरूळकर, स्पर्धचे पंच, तंत्रज्ञ यांचा समावेश होता. याशिवाय ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व जिल्हा योग असोसिएशनतर्फे आयोजित बाराव्या बृहन महाराष्ट्र योग व ३३ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या ८ ते ११ वयोगटातील एकूण बारा मुले आणि मुली, ११ ते १४ वयोगटातील एकूण बारा मुले आणि मुली तसेच १७ ते २१ वयोगटातील एकूण सहा मुले आणि मुली, २५ ते ३५ वयोगटातील खेळाडुंचा व ३५ वर्षांवरील महिला आणि पुरूष अशा एकूण सात अशा राज्यभरातील खेळाडुेंनी स्पर्धत बाजी मारली. संचालन पी. आर. राजपूत, संजय मराठे यांनी केले.संमेलन व स्पर्धेसाठी जिल्हा योग व महिला योग असोसिएशनचे पदाधिकारी, हव्याप्र मंडळ यांनी प्रयत्न केले.