शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महानगरातील वाढीव मालमत्ता कर आकारणी, वसुलीस स्थगिती; आदेश जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2024 12:44 IST

Amravati : सीएमच्या पत्रावर शासनाचे ५ सप्टेंबरला आदेश, आता जुनीच कर आकारणी

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : महानगरपालिकेच्या वतीने २०२३ या वर्षापासून लागू करण्यात आलेल्या वाढीव मालमत्ता कर आकारणी आणि वसुलीस शासनाने स्थगिती दिली आहे. यासंदर्भातील नगरविकास विभागाने ५ सप्टेंबर रोजी आदेश निर्गमित केले असून, यामुळे नागरिकांना वाढीव मालमत्ता कर आकारणीपासून तूर्तास दिलासा मानला जात आहे.

नवीन कर सुधारणा व नवीन कर आकारणी ही गतवर्षीच्या कर मूल्य निर्धारणाला अनुसरून नसल्याने मालमत्ता धारकांना आलेले कर भाडे हे चार पटीहून अधिक असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. राजकीय, सामाजिक संघटनांनी वाढीव घर टॅक्स रद्द करण्यासाठी मोर्चे, आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनास नागरिकांच्या भावना लक्षात आणून दिल्या होत्या. काही सुजाण नागरिकांनी प्रशासनाच्या मालमत्ता कर वाढीविरोधात उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे. आमदार सुलभा खोडके यांनी हा विषय शासनस्तरावर रेटून धरला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांकडे सातत्याने पाठपुरावा केला. बैठकीसुद्धा घेण्यात आल्यात. अखेर राज्य शासनाने मनपाने नागरिकांवर लादलेला वाढीव मालमत्ता कर आकारणी आणि वसुलीस स्थगिती दिली आहे. आता कर आकारणी ही २००५ नुसारच वसूल केली जाणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रपरिषदेतून आमदार सुलभा खोडके, राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके, आयुक्त सचिन कलंत्रे यांनी संयुक्तपणे दिली. 

रवी राणांच्या पत्रावरही मुख्यमंत्र्यांचा 'रिमार्क' आ. रवी राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे २५ ऑगस्ट रोजी दिलेल्या पत्रात मनपा क्षेत्रातील मालमत्तांना वाढीव कर आकारणीला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली. त्या पत्रावरही मुख्यमंत्री शिंदे यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवांना 'रिमार्क' करताना वाढीव मालमत्ता कर स्थगिती देण्याबाबत निर्देश दिले होते. 

शहरात नव्याने ५५ हजार मालमत्तांची नोंद अमरावती महानगरात नव्याने ५५ हजार मालमत्तांची नोंद करण्यात आली आहे. या मालमत्ता वाणिज्य तथा निवासी असून, त्यांच्यावरही जुन्याच पद्धतीने कर आकारणी होणार आहे. सुमारे ८० कोटींच्या वर मालमत्ता कर वसुलीचे लक्ष्य आहे. कर आकारणीला स्थगिती देत असताना, शासनाकडून महापालिकेला अनुदान मिळणार आहे.

"वाढीव मालमत्ता कर आकारणी व वसुलीस स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा मोठा वाटा आहे. वाढीव करापासून नागरिकांना दिलासा मिळावा, यासाठी सतत प्रयत्न करण्यात आले."- सुलभा खोडके, आमदार

"नव्या आदेशानुसार आता जुन्याच पद्धतीने मालमत्ता कर आकारणी आणि वसुली केली जाईल. ज्यांनी यापूर्वी कराचा भरणा केला, अशांची रक्कम समायोजित करण्यात येईल. ज्यांनी कर भरला नाही, अशांना दुरुस्ती करून जुन्याच पद्धतीने कराची देयके पाठविले जातील." -सचिन कलंत्रे, आयुक्त

टॅग्स :Amravatiअमरावती