शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

डासांच्या संख्येत वाढ, मात्र बहुतांश प्रभावहीन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:32 AM

शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्यात आली.

ठळक मुद्देहिवतापाच्या रुग्णांत घट : २०१८ मध्ये दोन हजारांपैकी ३९ नमुने पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात डासांची संख्या तर वाढत आहे, मात्र ते इन्फेक्टिव्ह नसल्याने हिवतापाच्या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत नगण्य असल्याचे निदर्शनास आले आहे. गुरुवार, २५ एप्रिल रोजी जागतिक हिवतापदिनी जिल्हा आरोग्य कार्यालयाद्वारा रॅलीद्वारे याबाबत जागृती करण्यात आली.हिवताप म्हणजेच मलेरिया होय. हा आजार 'अ‍ॅनाफिलिस' नावाच्या मादी डासापासून होतो. हे मादी डास रक्त शोषण करताना हिवतापाच्या रुग्णाचे रक्त शोषल्यानंतर इतर सुदृढ व्यक्तींना डंक मारताना प्रथम तिची लाळ डंकाद्वारा दुसऱ्याच्या शरीरात सोडते. त्यानंतर रक्त शोषण करते. या प्रक्रियेतून सदर व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू प्रवेश करतात. त्याची शरीरात वाढ झाल्यानंतर आठ दिवसांत अतिथंडी वाजून शरीर थंड पडते हे मलेरिया आजाराचे प्रथम लक्षण आहे. त्यानंतर आठ दिवसांनी मलेरिया आजार प्रकर्षाने जाणवतो. यावर वेळीच उपचार न झाल्यास जंतांचे प्रमाण वाढून मेंदूत ताप शिरल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. मागील काही दशकांत मलेरियाचा प्रसार वेगाने झाल्यामुळे ही मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे शासनातर्फे हिवतापाचे स्वतंत्र आरोग्य विभाग उदयास आले. प्रत्येक जिल्ह्यात ठरावीक ऋतूमध्ये हिवतापाची तपासणी केली जाते. डास उत्पत्ती थांबविली जाते. त्याचप्रमाणे जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान ३७०० नमुने तपासले गेले. त्यात १३६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यातुलनेत १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ मध्ये दोन हजार नमुने तापसण्यात आले. यामध्ये ३९ हिवतापाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. तसेच एप्रिल २०१९ मध्ये १७ नमुने घेण्यात आले. त्यात केवळ दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा हिवताप प्रयोगशाळा वैज्ञानिक मंजूषा देशपांडे यांनी दिली.गतवर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू पॉझिटिव्ह निरंक१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१८ मध्ये ३ हजार ६७९ रक्तजल नमुने घेण्यात आलेत. त्यामध्ये शहरी भागातील २ हजार ८६० व ग्रामीण भागातून ८१९ रुग्णांचा समावेश होता. यापैकी शहरी भागात ५२८ व ग्रामीण भागात १०२ रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले होते. यावर जिल्हा आरोग्य यंत्रणेने विविध उपाययोजना राबविली. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत घेण्यात आलेल्या १७ रक्तजल मनुन्यांत एकही डेंग्यू पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती आरोग्य सहायक जयंत माहोरे यांनी 'लोकमत'ला दिली.रॅलीद्वारे जनजागृतीया आजारावर संशोधन करून मलेरिया जंताचा शोध सर रोनॉल्ड रॉस यांनी लावला. २५ एप्रिल रोजी ते प्रचलित झाल्याने जागतिक हिवताप दिवस याच दिवशी साजरा केला जातो. जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे डॉ. बी.एस. वावरे यांच्या नेतृत्त्वात गुरुवारी सकाळी ८ वाजता रॅली काढून जनजागृती करण्यात आली. इर्विन चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून रेल्वे स्टेशन चौक, राजकमल चौक व्हाया डीएचओ कार्यालयात कार्यक्रम व कार्यालयात रॅलीची सांगता झाली. यावेळी विविध सुचक संदेश फलके घेऊन कर्मचाऱ्यांनी हिवताप आजाराबाबत जनजागृती केली.

टॅग्स :dengueडेंग्यू