मोबाईलमुळे वाहनचालकांच्या अपघातात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:38 IST2020-12-11T04:38:44+5:302020-12-11T04:38:44+5:30
कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत ...

मोबाईलमुळे वाहनचालकांच्या अपघातात वाढ
कावली वसाड : विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्राने केलेल्या प्रगतीमुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या हातात मोबाइल आले. मात्र, वाहन चालविताना मोबाईलवर बोलत असल्याने ग्रामीण भागात अनेक अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. पोलीस विभाग व अन्य विभागांकडून वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळा, असे आवाहन केले जाते. मात्र, अनेकजन त्या आवाहनाला जुमानत नसल्याचे चित्र आहे.
शहरी भाग असो किंवा ग्रामीण, लहान मुलांपासून तर वृुद्धापर्यंत प्रत्येकांच्या हातात मोबाईल आला आहे. दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालक वाहन चालविताना मोबाईलवर बोलत लक्ष विचलित होऊन अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही वाहनचालक सुसाट वाहन चालवीत मोबाईलवर बोलताना आढळतात. एकीकडे शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे मोबाईलवर झाले असल्याने मोठ्या प्रमाणात मोबाईलची खरेदी ग्रामीण झाली आहे. वाहन चालविताना मोबाइलवर बोलताना आढळल्यास वाहतूक पोलीस दंड वसूल करतात. मात्र पोलिसांची नजर चुकवून अनेक जण मोबाईलवर बोलत असतात. स्वत:ची सुरक्षा स्वत: केल्यास अपघात टाळता येतात. परंतु असे होताना दिसत नाही.